Advertisement

साधूंच्या हत्येवरून योगींचं राऊतांना प्रतिउत्तर, म्हणाले, महाराष्ट्र सांभाळा, यूपीची चिंता नको...

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये झालेल्या दोन साधुंच्या हत्येवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टोमणा मारणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना योगींनी तितक्याच तिखट शब्दांत प्रतिउत्तर दिलं आहे.

साधूंच्या हत्येवरून योगींचं राऊतांना प्रतिउत्तर, म्हणाले, महाराष्ट्र सांभाळा, यूपीची चिंता नको...
SHARES

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये झालेल्या दोन साधुंच्या हत्येवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टोमणा मारणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना योगींनी तितक्याच तिखट शब्दांत प्रतिउत्तर दिलं आहे. तुमचे राजकीय विचार बदलले असून तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, यूपीची चिंता नको, असं योगींनी राऊतांना सुनावलं आहे.

मुयूपीच्या बुलंदशहरमध्ये २७ एप्रिल रोजी दोन साधुंची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पालघरच्या घटनेप्रमाणे या साधुंच्या हत्या प्रकरणालासुद्धा धार्मिक रंग न देता त्याच्यावर कुणीही राजकारण करू नये, योगी आदित्यनाथ आरोपींना शोधून काढत त्यांच्यावर कठोर कारवाई करतील, अशा शब्दांत संजय राऊत यांनी योगींना टोमणा मारला होता. यामागचं कारण म्हणजे जेव्हा पालघरच्या घटनेत जमावाने दोन साधुंची हत्या केली होती, तेव्हा योगींनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करत कडक कारवाईची मागणी केली होती. 

हेही वाचा - यूपीतल्या साधू हत्याकांडावरून राऊतांचा भाजपला टोमणा, म्हणाले पालघरसारखं राजकारण नको

त्याचाच वचपा काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी देखील योगींना फोन करत चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे राऊतांवर आपला राग व्यक्त करण्यासाठी योगींच्या आॅफिस ट्वीटर हँडलवरून एक-दोन नव्हे, तर ३ ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, संतांच्या निर्घृण हत्येवर चिंता व्यक्त करणं हे राजकारण वाटतं का? पालघरच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेले साधू हे निर्मोही आखाड्यातील होते, त्यामुळेच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. 

पालघर येथील संतांच्या निर्घृण हत्येवर चिंता व्यक्त करणं, याला राजकारण केल्याचं म्हणणारे संजय राऊत तुमच्या वैचारीक दृष्टीला काय म्हणावं? वाईट संस्कारांचं परियच देणारी तुमची प्रतिक्रिया तुमचे बदललेले राजकीय विचार स्पष्ट करते.

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे. कायदा मोडणाऱ्यांवर इथं कठोर कारवाई केली जाते. बुलंदशहरमध्ये झालेल्या घटनेच्या काही तासांतच आरोपींना पकडण्यात आलं. तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, यूपीची चिंता करू नका.

असं म्हणत संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा - ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद संकटात?, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना राज्यपाल असं काही म्हणाले की…  


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा