Advertisement

ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद संकटात?, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना राज्यपाल असं काही म्हणाले की…

​राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या दोन जागांपैकी एका जागेवर नियुक्ती व्हावी, यासाठी सध्या महाविकास आघाडी सरकारचा आटापीटा सुरू आहे.

ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद संकटात?, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना राज्यपाल असं काही म्हणाले की…
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या दोन जागांपैकी एका जागेवर नियुक्ती व्हावी, यासाठी सध्या महाविकास आघाडी सरकारचा आटापीटा सुरू आहे. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना नवीन प्रस्ताव देण्यासाठी पुन्हा एकदा राजभवनवर गेले होते. परंतु यावेळी राज्यपालांना या मंत्र्यांना असं काही उत्तर दिलं की त्यावरून मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेच लवकर सुटणार नाही, असंच स्पष्ट झालं.

प्रकरण उच्च न्यायालयात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपालांच्या कोट्यातील दोन जागेंपैकी एका रिक्त जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो राज्यपालांकडं पाठवण्यात आला होता. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी अजून तरी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्रिपद हे घटनात्मक पद नसल्याने उपमुख्यमंत्र्यांना राज्यपालांकडे शिफारस पाठवण्याचा कायदेशीर अधिकारच नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णयच बेकायदा आहे. त्यामुळे ही शफारस रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंच्या आमदारकीच्या शिफारसीवर तातडीने कार्यवाही करा, मंत्रिमंडळाची राज्यपालांना पुन्हा विनंती

नव्याने प्रस्ताव मंजूर

असं असलं, तरी ही तांत्रिक चूक टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याबाबत मुख्यमंत्री यांनी अधिकृत पत्र दिलं. त्यानुसार सोमवारी पुन्हा एकदा मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुन्हा एकदा महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसंच या शिफारशीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तातडीने कार्यवाही करावी या विनंतीचा पुनरुच्चार करण्यात आला. 

राज्यपालांना निवेदन

त्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली आणि राज्य मंत्रिमंडळाने दुसऱ्यांदा ठराव करुन जो प्रस्ताव दिला आहे तो मान्य करावा अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली. यावर राज्यपालांनी केवळ विचार करतो, अशी प्रतिक्रिया दिली. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, हे नेते होते. यावरून तरी मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेच लवकर सुटेल असं वाटत नाही.

हेही वाचा- ‘राज्यात अघोषित आणीबाणी’, देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा