महिलांवरील अत्याचार प्रकरणात तातडीने कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस महासंचालकांना दिले.

SHARE

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस महासंचालकांना दिले. राज्यातील पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक ठाकरे यांनी मंगळवारी आयोजित केली होती. 

या बैठकीला राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे, यांच्यासोबत इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. महिला अत्याचार प्रकरणात गुन्हेगाराला वचक बसेल इतक्या जलदगतीने आणि तत्काळ कारवाई पोलिसांनी करावी, अशी इच्छा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच देशातील पोलिस महासंचालकांच्या परिषदेत महाराष्ट्र पोलिसांच्या कामाचं कौतुक झालं, त्याची प्रशंसा देखील मुख्यमंत्र्यांनी केली.

गेल्या सरकारच्या काळात अत्याचारग्रस्त महिलांसाठी राखीव असलेल्या निर्भया निधीचा उपयोग न झाल्याने या निधीचा योग्य उपयोग होण्यासाठी तरतूद करावी, असे आदेश देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या