Advertisement

‘सीएए’विरोधात ‘वंचित’ची महाराष्ट्र बंदची हाक

देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था, एनआरसी आणि सीएएविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवार २४ जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

‘सीएए’विरोधात ‘वंचित’ची महाराष्ट्र बंदची हाक
SHARES

देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था, एनआरसी आणि सीएएविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवार २४ जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दादर येथील आंबेडकर भवनात झालेल्या  वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

हेही वाचा- तर, राऊत कुठंतरी कारकुनी करत असते, मनसेच्या ‘या’ नेत्याने लगावला टोला

जीएसटी, नोटबंदीच्या निर्णयाचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळीत झाली असून लाखो तरूण बेरोजगार झाले आहेत. परंतु याकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी केंद्रातील भाजप सरकार या मुद्द्यांवरून जनतेचं लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे. एनआरसी आणि सीएए विरोधात देशातील जनतेचा प्रचंड विरोध असूनही हे कायदे जबरदस्तीने लागू करण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. या दडपशाहीला वंचितचा विरोध असून हा विरोध दर्शवण्यासाठीच मुंबईसहीत महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.   

वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीला अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांनी बंदच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. असून या बंदमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

हेही वाचा- भविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही, थोरातांचा राऊतांना टोला

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा