Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की अजित पवार? प्रकाश आंबेडकर

ग्राहकांनी वाढीव वीज बिल भरु नये. वीज जोडण्या तोडल्या गेल्या तर वंचित बहुजन आघाडी त्या जोडण्या पुन्हा जोडून देईल, असं आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी वीज ग्राहकांना केलं.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की अजित पवार? प्रकाश आंबेडकर
SHARES

वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (uddhav thackeray) आहेत की अजित पवार? असा खोचक प्रश्न देखील उपस्थित केला आहे. 

महावितरणनने लाॅकडाऊनच्या काळात वीज ग्राहकांना पाठवलेल्या वाढीव वीज बिलात सवलत देऊ, असं आश्वासन राज्य सरकारच्या वतीने आधी देण्यात आलं होतं. त्याबाबतचा प्रस्ताव वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला होता. मुख्यमंत्री त्यावर सकारात्मक देखील होते. मात्र हा प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी दाबून ठेवला आहे. यामुळे राज्य नेमकं कोण चालवतं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की अजित पवार? असा प्रश्न उपस्थित करत असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांना सांगितलं.

हेही वाचा- वीज ग्राहक आमचा देव, पण, वाढीव वीज बिलांवरून ऊर्जामंत्री म्हणाले...

वीज बिल माफीवरुन महाविकास आघाडी सरकारने ग्राहकांची फसवणूक केली आहे. कारण एप्रिलपासून आलेल्या बिलांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ कुणाच्या सांगण्यावरुन केली? कशी केली ते सरकारने स्पष्ट करावं. मार्च २०२० ला ५१ हजर ९४६ कोटी असलेली थकबाकी. २०१४ मध्ये निम्म्याहून कमी होती, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळात मीटर रिडिंगसाठी कंत्राट दिलं होतं. त्यामुळे मीटर रिडिंगबाबतीत आमच्याकडून चूक झाली. ५० टक्के वीज बिल माफीचा प्रस्ताव आम्ही सरकारकडे पाठवला आहे, असं बोलणाऱ्या महावितरणने आणि सरकारने आता घूमजाव केलं आहे. त्यामुळे ग्राहकांनी वाढीव वीज बिल भरु नये. वीज जोडण्या तोडल्या गेल्या तर वंचित बहुजन आघाडी त्या जोडण्या पुन्हा जोडून देईल, असं आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी वीज ग्राहकांना केलं.   

(vba chief prakash ambedkar requested people not to pay extra electricity bill in maharashtra)

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा