Advertisement

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते मुंबईतल्या घरीच क्वॉरंटाइन झाले आहेत.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण
SHARES

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते मुंबईतल्या घरीच क्वॉरंटाइन झाले आहेत. पावसाळी अधिवेशनाला अवघे तीन दिवस उरलेले असतानाच नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाची लागण झाल्याची माहिती नाना पटोले यांनी ट्विट करून दिली आहे.

गेले अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली. ती चाचणी सकारात्मक आली आहे. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये.  तसंच गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

७ आणि ८ सप्टेंबर रोजी विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे ६ सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची कोविड १९ साठीची ‘आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात येणार आहे. कोविड चाचणी निगेटिव्ह असलेल्या सदस्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था आवश्यकतेप्रमाणे सभागृहाच्या प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्येही करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक सदस्याला सुरक्षा किट देण्यात येणार आहे. या किटमध्ये फेस शील्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी वस्तूंचा समावेश असेल.


हेही वाचा -

राज्यात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ८ हजारांच्या वर



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा