Advertisement

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विजय औटी

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले औटी हे माजी आमदार भास्करराव औटी यांचे पुत्र असून १९८५ मध्ये त्यांनी सर्वप्रथम काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला.

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विजय औटी
SHARES

मागील चार वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अखेर शुक्रवारी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळं औटी यांच्या मार्ग मोकळा झाला नि त्यांची बिनविरोध विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.


काँग्रेसकडून निवडणूक लढवली 

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले औटी हे माजी आमदार भास्करराव औटी यांचे पुत्र असून १९८५ मध्ये त्यांनी सर्वप्रथम काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. विद्यार्थीदशेपासूनच विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून औटींनी आपल्या राजकीय वाटचालीस सुरूवात केली होती.

 तुरूंगवास भोगला

१९७७ मधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या ५२ दिवसांच्या संपाला पाठिंबा देत ७ दिवसाचा तुरूंगवासही त्यांनी भोगला होता. २००४ मध्ये विजय औटी हे शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. दरम्यान २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यावेळी त्यांना माघार घ्यावी लागली होती. 


बिनविरोध निवड 

आता मात्र शिवसेनेतील अभ्यासू मानल्या जाणाऱ्या विजय औटी यांच्या गळ्यात विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची माळ पडली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाचे हरिभाऊ बागडे विराजमान असून विधानसभेचं उपाध्यक्षपद मात्र रिक्तच होत. त्यामुळं हे पद भरण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी बुधवारी निवडणुक जाहीर केली. त्यानुसार शिवसेनेकडून विजय औटी, काँग्रेसकडून हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांचे अर्ज दाखल झाले होते. मात्र हर्षवर्धन सकपाळ आणि बच्चू कडू या दोघांनी अर्ज मागे घेतले आणि त्यामुळं विजय औटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.हेही वाचा - 

मराठा आरक्षणानंतर आता धनगर-मुस्लिम आरक्षणासाठी विरोधक आक्रमक

दक्षिण मुंबईतील मेट्रो-३ च्या कामाचा मार्ग मोकळा, अंतरिम स्थगिती उठवली
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा