उन्हातही मतदारांचा उत्साह शिगेला

Mumbai  -  

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत मतदान करुन मतदारांनी आपला हक्क बजावला. सकाळपासून प्रत्येक केंद्रावर लोकांची गर्दी पाहायला मिळाली. गेले 2 दिवस मुंबईकरांना उन्हाच्या तडाख्याला सामोर जावं लागलं. मतदानाच्या दिवशीही उन्हाचा तडाखा तेवढाच होता. याचा परिणाम मतदानावर होईल असं वाटत होतं. पण, अशा उन्हातही मुंबईकर मतदान करायला बाहेर पडला. ‘मुंबई लाइव्ह’ने अशाच काही लोकांशी बातचीत केलीय. तर, यावेळी प्रत्येकाने मतदान हा आपला हक्क आहे आणि तो आपण बजावला पाहिजे असं मत व्यक्त केलं.

Loading Comments