Advertisement

आर नॉर्थ - आर सेंट्रलमध्ये सर्वाधिक मतदान


आर नॉर्थ - आर सेंट्रलमध्ये सर्वाधिक मतदान
SHARES

मुंबई - महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडलं. 2012 च्या तुलनेत यंदा मुंबईकरांनी रेकॉर्डब्रेक मतदान केले. महापालिका निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच 55 टक्क्यांपर्यंत मुंबईत मतदान झाले आहे. 2012 ला 47 टक्के मतदान झाले होते. दरम्यान मुंबईच्या आर सेंट्रल आणि आर नॉर्थ(बोरिवली ते दहिसर)मध्येही मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान केल्याचे पहायला मिळाले. आर सेंट्रलमध्ये 61.5 टक्के तर आर नॉर्थमध्ये 60 टक्के मतदान झाले. तर दुसरीकडे गिरगाव, बाबुलनाथ आणि महालक्ष्मीमध्ये वॉर्ड सी आणि डीमध्ये कमी मतदान झाल्याचे पहायला मिळाले. या विभागात 47.27 टक्के मतदान झाले. सरासरी पाहिली तर 14 वॉर्डमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे.
यामध्ये पहिल्या स्थानावर आर सेंट्रल 61.5 टक्के मतदान तर दुसऱ्या स्थानावर टी आणि एस वॉर्ड राहिले आहेत जिथे 60.5 टक्के मतदान झाले. तर तिसऱ्या स्थानावर आर नॉर्थ आणि के ईस्ट हे वॉर्ड राहिलेत. या वॉर्डमध्ये 60 टक्के मतदान झाले. तर एच इस्ट-58.94 टक्के,पी नॉर्थ-1 मध्ये 56.5 टक्के आणि एफ साऊथ मध्ये 55.27 टक्के मतदान झाले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा