शिवसेना कार्यालयाच्या उद् घाटनामुळे वाहतूक कोंडी

 Kandivali
शिवसेना कार्यालयाच्या उद् घाटनामुळे वाहतूक कोंडी

कांदिवली - क्रांतिनगर वार्ड क्रमांक 39 मध्ये शिवसेनेच्या विजया सावंत यांनी सोमवारी आपल्या पक्षाच्या प्रचार कार्यालयाचं उद् घाटन केलं. या उद् घाटनप्रसंगी स्थानिक खासदार गजानन किर्तीकर यांच्यासह आमदार सुनिल प्रभू आणि भौम सिंह राठोड ही उपस्थित होते.

हा कार्यक्रम 2 तासांपासून सुरू होता. त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला होता. ज्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. रस्ता बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी ही झाली. याविषयी मात्र उमेदवारांनी बोलायला नकार दिला.

Loading Comments