लढाई श्रेयवादाची...

  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईकरांचं सध्या लक्ष लागलंय ते पालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजापा युतीकडे. एकीकडे युतीसाठी दोन्ही पक्षांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे युती होणार की नाही यावर उलट सुलट चर्चा सुरु आहेत. युतीबद्दल संभ्रम असताना सध्या दोन्ही पक्षांकडून आश्वासनांची खिरापत मात्र वाटली जात आहे. भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी तर थेट माफियांशी समझोत्याची चर्चा शक्यच नसल्याचं म्हणत शिवसेनेला डिवचलंय.

  मागच्या निवडणुकीत कुणी काय करून दाखवलं, याचा हिशोब लागत नसताना DID You know असं म्हटलं जातंय. त्यातच आता वचननामा जाहीर होण्याआधीच शिवसेनेने नव्या आश्वासनांचा पाऊस मुंबईकरांवर पाडलाय. यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झालीय. त्यामुळे मुंबईकरांनो, अजून किती खालच्या दर्जाचे राजकारण तुम्हाला येत्या काळात पहावं लागणार आहे याचा प्रत्यय तुम्हाला आलाच असेल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.