Advertisement

प्रभाग समिती निवडणुकीत भाजपाची सरशी


प्रभाग समिती निवडणुकीत भाजपाची सरशी
SHARES

मुंबई - मुंबई महापालिकेच्या सतरा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीपैकी आठ प्रभाग समित्यांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. या आठ प्रभागांपैकी भाजपाने चार आणि भाजपा पुरस्कृत अखिल भारतीय सेनेने एक याप्रमाणे पाच प्रभाग समित्या जिंकल्या आहेत. उर्वरीत तीन प्रभागांमध्ये शिवसेनेचे अध्यक्ष निवडून आले आहेत.

मुंबई महापालिकेच्या ए, बी आणि ई प्रभाग समिती वगळता उर्वरीत सर्व ठिकाणच्या प्रभाग समिती अध्यक्षांची निवड ही बिनविरोध झाली होती. या सातही प्रभाग समित्यांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज भरला नव्हता. त्यामुळे या सर्वांची निवड ही बिनविरोधच होती. परंतु मंगळवारी झालेल्या निवडणुकीत त्यांची औपचारिक घोषणा करण्यात आली.

केवळ ‘ए, बी आणि ई’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपाच्या पाठिंब्यावर अभासेच्या गीता गवळी आणि काँग्रेसच्या वतीने जावेद जुनेजा यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. परंतु निवडणुकीत गीता गवळी यांना अधिक मते मिळाल्यामुळे पिठासीन अधिकारी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी त्यांना विजयी घोषित केले. या आठही प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम सांभाळले.

प्रभाग समिती अध्यक्षपदी निवड झालेले नगरसेवक

  • ‘ए, बी व ई’ प्रभाग समिती अध्यक्ष : गीता गवळी (अभासे)
  • ‘सी व डी’ प्रभाग समिती अध्यक्ष : जोत्स्ना मेहता (भाजपा)
  • ‘एफ/दक्षिण व एफ/उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्ष : प्रल्हाद ठोंबरे (शिवसेना)
  • ‘जी/दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्ष : आशिष चेंबुरकर (शिवसेना)
  • ‘पी/दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्ष : राजुल देसाई (भाजपा)
  • ‘पी/उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्ष : दक्षा पटेल (भाजपा)
  • ‘आर/दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्ष : कमलेश यादव (भाजपा)
  • ‘आर/उत्तर, आर/मध्य’ प्रभाग समिती अध्यक्ष : शीतल म्हात्रे (शिवसेना)
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा