Advertisement

राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी

राज ठाकरे यांच्याविरोधात वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी बेलापूर न्यायालयानं वॉरेंट जारी केलं आहे.

राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी बेलापूर न्यायालयानं वॉरेंट जारी केलं आहे. २६ जानेवारी २०१४ रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाक्यावर तोडफोड केली होती. याप्रकरणी राज ठाकरे यांना येत्या ६ फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्यास सांगितलं आहे.

६ जानेवारी २०१४ रोजी वाशीमध्ये राज ठाकरेंनी केलेलं भाषण हे भडकावू होते, असा आरोप त्यांच्यावर आहे. त्या भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे. या प्रकरणाची बेलापूर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

२०१८, २०२० मध्येही राज ठाकरे यांच्याविरोधात समन्स आणि वॉरेंट काढण्यात आलं होतं. पण अनेक वेळा न्यायालयात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे आता बेलापूर न्यायालयानं राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरेंट जारी केलं आहे.

 दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत राज्य सरकारकडून नुकतीच कपात करण्यात आली आहे. राज ठाकरे यांची Z दर्जाची सुरक्षा काढून त्यांना Y+ सुरक्षाव्यवस्था देण्यात आली आहे. त्यावरुन मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.



हेही वाचा

आधी औरंगाबादचं संभाजीनगर करा, भाजप नेत्याकडून मुख्यमंत्र्यांची खिल्ली

सीमा वादावर ‘हेच’ शेवटचं हत्यार- शरद पवार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा