Advertisement

आधी औरंगाबादचं संभाजीनगर करा, भाजप नेत्याकडून मुख्यमंत्र्यांची खिल्ली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं, अन्यथा झेपत नाही असं जाहीर करावं, अशा शब्दांत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे.

आधी औरंगाबादचं संभाजीनगर करा, भाजप नेत्याकडून मुख्यमंत्र्यांची खिल्ली
SHARES

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील वादग्रस्त भूभाग महाराष्ट्रात आणण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं, अन्यथा झेपत नाही असं जाहीर करावं, अशा शब्दांत भाजपचे (bjp) आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे.

बेळगावचा समावेश केंद्र शासित प्रदेशात व्हावा म्हणून सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जरूर करा, परंतु त्या आधी तुमच्या हाती असलेल्या राज्यात औरंगाबादचं संभाजीनगर तर करा.. नाही तर झेपत नाही म्हणून जाहीर करा, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

"रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में" तसंच "बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" या सीमावासियांच्या घोषणांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (sharad pawar) यांच्या हस्ते "महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: संघर्ष आणि संकल्प" पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.

हेही वाचा- सीमा वादावर ‘हेच’ शेवटचं हत्यार- शरद पवार

यावेळी बोलताना कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडे सर्व पक्षीयांनी एकजुटीने व आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना, कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले आहे, ते थांबवावं लागेल.

महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यातील वादग्रस्त सीमा प्रकरणावर जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित का करण्यात येऊ नये? अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

तर, आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी त्यासाठी चांगली तयारी केली आहे. सुप्रीम कोर्ट हे आपलं शेवटचं हत्यार आहे. त्यामुळे तिथं आपल्याला चांगली तयारी करूनच जावं लागेल. आपल्याला उचित असा अनुकूल निर्णय कसा मिळेल, यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

(bjp mla atul bhatkhalkar criticized cm uddhav thackeray on aurangabad name change)

हेही वाचा- तुमची तोंडं आता का शिवली आहेत ?, आशिष शेलारांचा पवार-राऊत यांना सवाल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा