Advertisement

तंगड्या तोडण्याची भाषा नको, तंगड्या प्रत्येकाला असतात, राऊतांनी उदयनराजेंना सुनावलं

‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि भाजप नेते उदयनराजे यांच्यातील वाकयुद्ध सुरूच आहे.

तंगड्या तोडण्याची भाषा नको, तंगड्या प्रत्येकाला असतात, राऊतांनी उदयनराजेंना सुनावलं
SHARES

‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि भाजप नेते उदयनराजे यांच्यातील वाकयुद्ध सुरूच आहे. उदयनराजेंनी पत्रकार घेत कुणी काहीही बोललेलं यापुढं खपवून घेणार नाही, अशी तंबी दिल्यानंतर राऊतांनी उदयनराजेंवर पलटवार केला आहे. 

'आज के शिवाजी: नरेंद्र मोदी' पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. त्यावर शिवसेना स्थापन करताना शिवरायांच्या वंशजांना विचारलं होतं का? शिवसेनेतलं शिव काढून दाखवा, असं आव्हान उदयनराजेंनी दिलं होतं.

हेही वाचा- डाॅन करीम लालाला भेटायच्या इंदिरा गांधी, संजय राऊतांनी केला खुलासा

त्यावर बोलताना राऊत म्हणाले, कोल्हापूर, साताऱ्याच्या गादीचा आम्हाला आदर आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे माझे मित्र आहेत. सातारचे शिवेंद्रराजे संयमाने काम करतात. अभयसिंहराजेंसारखा सज्जन माणूस राजकारणात नव्हता. उदयनराजेंच्या मातोश्री शिवसेनेच्या लोकसभेच्या उमेदवार होत्या. शिवरायांच्या गाद्यांबद्दल शिवसेनेला नेहमी आदर आहे. उदयनराजे हे ठाकरे, पवार, उद्धवजींबद्दल बोलता, आम्हालाही लोकशाहीत उत्तर देण्याचा अधिकार आहे. तंगड्या तोडण्याची भाषा आम्ही कधीच केली नव्हती. कुणी तशी भाषा करत असेल तर लोकशाहीत ते चालत नाही. तंगड्या प्रत्येकाला असतात. सामान्य नागरिकही तुम्हाला उत्तर देऊ शकतात. लोक पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही प्रश्न विचारतात. १० ते १५ लोक छत्रपतींचे वंशज असू शकत नाहीत. महाराष्ट्रातील ११ कोटी जनता शिवरायांची वंशज आहे. त्यामुळं तुम्ही आम्हाला आदर द्या, आम्ही तुम्हाला आदर देऊ,' असं ते म्हणाले.

हेही वाचा- रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, शरद पवार यांच्या वक्तव्याने वादात भर?

संबंधित विषय
Advertisement