पवारांनी मतदान केलं कुणाला?

  Mahalaxmi
  पवारांनी मतदान केलं कुणाला?
  मुंबई  -  

  मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महालक्ष्मी अपर मराठी शाळेतील मतदान केंद्रात जावून मतदानाचा हक्क बजावला. परंतु पवार यांचे निवासस्थान असलेल्या या प्रभाग 214 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडणूक रिंगणात नाही. त्यामुळे पवार यांनी कुणाला मतदान केले याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. पवार यांनी पक्षाचा उमेदवार नसल्यामुळे 'नोटा'चा वापर केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

  महापालिकेच्या प्रभाग 214 मधून शिवसेनेचे अरविंद बने, भाजपाचे अजय पाटील आणि काँग्रेसच्यावतीने कौशिक शहा निवडणूक रिंगणात आहेत. मात्र या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नव्हता. त्यामुळे या प्रभागातील मतदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जेव्हा मतदान करण्यास आले तेव्हा त्यांनी कुणाला मतदान केले याची खसखस चांगली पिकली आहे. महालक्ष्मी अपर मराठी शाळेत शरद पवार यांच्यासह त्यांची नातसुद्धा मतदान करण्यास आली होती. तिचे हे पहिले मतदान होते. त्यामुळे आजोबा आणि नातीने कोणाच्या पारड्यात आपले मत टाकले हे जाणून घेण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता ताणली आहे. पवार यांचे बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेली मैत्री सर्वश्रृत आहे. त्यामुळे कमळ-धनुष्यबाण की नोटा याचे बटन दाबून मतदानाचा हक्क बजावला याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.