Advertisement

राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर लढावंच लागेल - अमित शाह


राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर लढावंच लागेल - अमित शाह
SHARES

राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्याच तर, आम्हाला लढावंच लागेल. मैदान सोडून जाता येणार नाही, असे भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केले. निवडणुका झाल्या तर भाजपा जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबईमध्ये शनिवारी अमित शाह यांची पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. रविवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी अमित शाह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेची कशी समजूत काढायची ते आमच्यावर सोडा, तुम्हाला थोडेच शिवसेनेची समजूत काढायची आहे, असे म्हणत अमित शाह यांनी शिवसेना-भाजपा मुद्द्यावर बोलणे टाळले.

पत्रकार परिषदेत अमित शाह यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबद्दलही वक्तव्य केले. उमेदवाराच्या नावावर सहमतीसाठी विरोधी पक्षांची चर्चा सुरू आहे. तसेच इतर पक्षांकडून सूचना मागविण्यात आल्याचे अमित शाह यांनी सांगितले आहे. प्रत्येक पक्षाने दिलेल्या सल्ल्यावर विचार केला जाईल, असे उत्तर अमित शाह यांनी दिले. मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अमित शाह यांनी भाजपाने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. मोदी सरकारने तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा आणि गती दिली. सरकारवर आतापर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महिला, आदिवासी, गरिबांसाठी आणलेल्या योजनांचाही त्यांनी उल्लेख केला. काळा पैसा आणि बेनामी संपत्तीविरोधात सरकारने महत्त्वाची पाऊले उचलली, असेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा - 

अमित शाहांचे स्वागत अन् भाजपाचे शक्तिप्रदर्शन

भाजपाचे शक्तीप्रदर्शन


शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा संवदेनशील -
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा संवेदनशील होता. भाजपा सरकारने तो सोडविला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा बोजा बँकांवर पडणार नाही, अशी ग्वाही अमित शाह यांनी दिली.

भाजपा सरकारने बऱ्याच योजना आणल्या -
शाह म्हणाले की, 50 वर्षांच्या सरकारने केव्हा तरी केलेली कामे भाजपा सरकारने 3 वर्षांत पूर्ण केली. देशाची अर्थव्यवस्था, शेअर बाजार, आर्थिक विकास या सर्व स्तरावर गती प्राप्त केली आहे. गरीब, युवा, महिला, वृद्ध, शेतकरी यांच्यासाठी बऱ्याच योजना आणल्या आहेत. तसेच या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचावा यासाठी योग्य नियोजन देखील करण्यात आले आहे, असे शाह यांनी सांगितले. तर 5 वर्षांत 5 करोड नागरिकांना सिलेंडर देण्याचा संकल्प भाजपा सरकारने केला होता. त्यानुसार सव्वा दोन करोड नागरिकांना सिलेंडर देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 7 करोड 64 लाख लोकांना मुद्रा बँकेमधून विना साक्षीदार कर्ज उपलब्ध करुन रोजगार मिळवून देण्यात आला आहे. 4.5 करोड लोकांच्या घरी शौचालयाची उभारणी, 13 हजार गावांमध्ये वीज, ओबीसीला संवैधानिक मान्यता दिली. एक लाखापेक्षा जास्त विकास कामांचा आरंभ आदी कामे भाजपा सरकारने पारदर्शीपणे केली आहेत, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा