Advertisement

मी 6 तारखेरा बारसूला जाणार, उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंचं आव्हान स्वीकारलं

बारसू येथील नियोजित तेलशुद्धीकरण प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे.

मी 6 तारखेरा बारसूला जाणार, उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंचं आव्हान स्वीकारलं
SHARES

बारसू रिफायनरी प्रकल्पावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले होते. उद्धव ठाकरे कोकणात आले तर त्यांना कोकणातून पळवून लावू असा धमकीवजा इशाराही त्यांनी दिला होता. नारायण राणे यांनी दिलेले आव्हान उद्धव ठाकरे यांनी स्विकारले आहे. 

मी येत्या 6 तारखेला बारसूला जाणार आणि त्या ठिकाणी बोलणार, तुम्ही मला कोण अडवणारे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी आज झालेल्या वज्रमुठ सभेत उपस्थित केला. 

ते पुढे म्हणाले की, मी बारसूतल्या लोकांना भेटणार आणि बोलणार. मला अडवणारे तुम्ही कोण? मी 6 मेला बारसूला जाणार आहे. मी ती जागा सूचवली होती, पण त्याठिकाणी पोलिसांना पाठवा, लाठीमार करा असं लिहिलं होतं का? सर्वमान्यता मिळाली तरच बारसूत रिफायनरी होणार. 

मुंबईतल्या बीकेसीतली जागा ही बुलेट ट्रेनच्या घशात घातली असं ते म्हणाले. महाराष्ट्रापासून मुंबई तोडणाऱ्यांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, मग तो कोणीही असो असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. 

तसेच मराठी भाषा आम्ही सक्तीची केली पण मिंधे सरकार आलं आणि यांनी ती ऐच्छिक केली, बाळासाहेबांचे विचार असल्याचं सांगणाऱ्या मिंध्यांना काहीच वाटत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

दरम्यान, बारसू येथील नियोजित तेलशुद्धीकरण प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. प्रकल्पविरोधी संघर्ष समितीने प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारले होते. पोलिसांनी सत्यजित चव्हाण यांच्यासह संघर्ष समितीच्या ४० कार्यकर्त्यांना अटक केली होती.

सुटका झाल्यावर चव्हाण यांनी पवार यांची भेट घेतली. या वेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. या भेटीत पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या अत्याचाराची माहिती आपण पवार यांना दिली.

तसेच शरद पवार यांनी बारसूला भेट द्यावी, अशी विनंती शिष्टमंडळाने केली असता त्यावर विचार करण्याचे आश्वासन पवारांनी दिले, असे चव्हाण यांनी सांगितले.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा