Advertisement

तर, राम मंदिरासाठी १९९२ सारखं आंदोलन करू- आरएसएस

गरज पडल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) राम मंदिराच्या उभारणीसाठी १९९२ सारखं आंदोलन करेल', असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शुक्रवारी दिला. भाईंदरच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत मागील ३ दिवसांपासून 'आरएसएस'चं शिबीर सुरू आहे.

तर, राम मंदिरासाठी १९९२ सारखं आंदोलन करू- आरएसएस
SHARES

'राम मंदिर व्हावं ही देशातील कोट्यवधी जनतेची इच्छा आहे. त्यामुळे न्यायालयाने उशीर न करता राम जन्मभूमी संदर्भातील खटला लवकरात लवकर निकाली काढावा'. तसंच 'केंद्र सरकारने राम मंदिरासाठी लवकरात लवकर अध्यादेश काढावा. नाहीतर गरज पडल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) राम मंदिराच्या उभारणीसाठी १९९२ सारखं आंदोलन करेल', असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शुक्रवारी दिला. भाईंदरच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत मागील ३ दिवसांपासून 'आरएसएस'चं शिबीर सुरू आहे. या शिबिरात संघाचे सरकार्यवाहक भैयाजी जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला.

महत्त्वाचं म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्यात शिबिरादरम्यान गुप्त बैठक झाल्यानंतर काही वेळातच आरएसएसने ही भूमिका जाहीर केली.


सुनावणी पुढे

न्यायालयीन प्रक्रियेबाबत जोशी म्हणाले की, ''२०१० च्या अलाहाबाद न्यायालयाच्या निर्णयानंतर सध्या राम मंदिर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. दिवाळीआधी आनंदाची बातमी मिळेल असं आम्हाला वाटत होतं. परंतु न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली.''


उशीर अत्यंत वेदनादायी

''त्यावर याप्रकरणी कधी निर्णय होईल? असं आम्ही न्यायालयाला विचारल्यावर आमचं प्राधान्य वेगळं आहे, असं उत्तर न्यायालयाकडून मिळालं. या उत्तरामुळे हिंदू समाजाला अपमानित झाल्यासारखं वाटत आहे. आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो. न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. परंतु न्यायप्रक्रियेत होत असलेला उशीर अत्यंत वेदनादायी आहे'', असं जोशी म्हणाले.


तर, पुन्हा आंदोलन

आम्ही गेल्या ३० वर्षांपासून राम मंदिर उभारण्यासाठी आंदोलन करत आहोत. लोकांच्या इच्छेनुसारच राम मंदिर व्हायला हवं असं आम्हाला वाटतं. त्यानुसार सर्वोच्च न्यायालय लोकभावनेचा विचार करून निर्णय देईल अशी आम्हाला आशा आहे. असं असलं, तरी गरज पडल्यास १९९२ सारखं आंदोलन करण्यात येईल', असा इशाराही त्यांनी दिला.



हेही वाचा-

अमित शहा-भागवत यांच्यात गुफ्तगू

तर, राम मंदिर उभारण्यासाठी १ हजार वर्षे लागतील- संजय राऊत



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा