शुभारंभालाच वादाची ठिणगी


  • शुभारंभालाच वादाची ठिणगी
SHARE

मुंबई - अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 24 डिसेंबरला होतंय. हा कार्यक्रम संस्मरणीय ठरावा, यासाठी राज्यातील 16 पवित्र ठिकाणांवरुन पाणी आणि माती आणण्यात येणार आहे. हे स्मारक दोन टप्प्यात बनविण्यात येणार आहे.

एकीकडे स्मारक होतंय तर दुसरीकडे विरोधाचेही सुर पाहायला मिळतायेत. अरबी समुद्रात होऊ घातलेल्या भव्य शिवस्मारकाच्या जागेचा विरोध अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केलाय.
मुंबईच्या अरबी समुद्रातील शिवाजी महाराज स्मारकामुळे पर्यटनाला नक्की चालना मिळेल. मात्र या स्मारकाचे भूमीपूजन जरी पंतप्रधानांच्या हस्ते होत असले तरी या स्मारकाविरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणा समोर सुनावणी सध्या सुरु आहे आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयातही याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे स्मारक होण्याआधीच वादाचे पडसाद उमटू लागले हे मात्र नक्की.

संबंधित विषय
ताज्या बातम्या