पालिका निवडणुकीच्या आखाड्यात तृतीयपंथी

मुंबई - पालिका निवडणुकीच्या आखाड्यात तृतीयपंथी देखील आपलं नशीब आजमावताना दिसत आहेत. वॉर्ड क्रमांक 166 मध्ये प्रिया पाटील या तृतीयपंथीने अपक्ष म्हणून आपला उमेदवारी शुक्रवारी अर्ज दाखल केला. मोदींच्या सबका साथ विकास ही मोदींची लाईन मात्र आता या लाईनचा आधार घेत प्रिया पाटील निवडणूक लढवणार आहेत. आपण सर्वसामान्यांना ज्ञान देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे प्रिया पाटील यांनी सांगितलं आहे.

Loading Comments