Advertisement

गोंधळात अधिवेशनाला सुरुवात, विरोधकांचं पायऱ्यांवरच धरणं आंदोलन

अधिवेशनाची सुरुवातच गोंधळात झाली आहे. दुष्काळ आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणं आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

गोंधळात अधिवेशनाला सुरुवात, विरोधकांचं पायऱ्यांवरच धरणं आंदोलन
SHARES

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारी मुंबईत सुरुवात झाली. ५५ वर्षानंतर मुंबईत होणारं हिवाळी अधिवेशन मराठा-धनगर आरक्षण आणि दुष्काळाच्या मुद्द्यांमुळे गाजणार असे संकेत सुरुवातीपासूनच मिळत होते. त्यानुसार अधिवेशनाची सुरुवातच गोंधळात झाली आहे.
दुष्काळ आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणं आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'ठग्ज आॅफ महाराष्ट्रा'चं पोस्टर हातात धरून विरोधक धरणं आंदोलन करताना दिसले.


 विरोधकांकडून घोषणाबाजी

मराठा आरक्षण, दुष्काळ, राज्यातील कायदा-सुव्यवस्था या प्रश्नांवर सरकारच्या विरोधात विरोधकांकडून घोषणाबाजी सुरू असतानाच शिवसेनेचे आमदारही सरकारविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळालं.

विविध प्रकल्पांसाठी झाडांची कत्तल करणाऱ्या विषयांपासून ते माहुल प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनापर्यंतच्या मागण्या करत शिवसेनेच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारविरोधात जोरदार आंदोलन केलं.


विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणं आंदोलन करणाऱ्या विरोधकांचा आक्रमक पवित्रा विधानसभेतही कायम होता. कारण विधानसभेला सुरुवात होताच मराठा आरक्षण आणि दुष्काळाच्या प्रश्नावर हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य आमदार थेट व्हेलमध्ये उतरले. त्यानंतर त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रश्नांवर चर्चा होईल असं सांगत विनंती केल्यानंतर विरोधक शांत झाले नि त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली.


हेही वाचा - 

सरकारनं जनतेला ठगवलं, विरोधकांचा आरोप

मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- राधाकृष्ण विखे-पाटील

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा