Advertisement

भीमा कोरेगाव आंदोलकांवरील गुन्हेही मागे घ्या, राष्ट्रवादीची मागणी

मुख्यमंत्र्यांनी भीमा कोरेगाव आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

भीमा कोरेगाव आंदोलकांवरील गुन्हेही मागे घ्या, राष्ट्रवादीची मागणी
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते एकामागोमाग एक धडाकेबाज निर्णय घेत सुटले आहे. आरे कारशेड आणि नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी भीमा कोरेगाव आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हेही वाचा- नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश


राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्र्यांना या मागणीचं पत्र दिलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ देखील उपस्थित होते. तत्कालीन फडणवीस सरकारने भीमा कोरेगाव इथं झालेल्या दंगलीत अनेक तरूण कार्यकर्ते आणि महिलांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्याचसोबत इंदू मिल आंदोलनातील तरूणांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घेऊन दलित समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. 

याच प्रकारची मागणी करणारं पत्र राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. भाजप सरकारने बुद्धीजीवी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि निरपराधांना नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर खोटे खटले दाखल केले आहेत. हे खटले मागे घ्यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी या पत्राची दखल घेऊन हे गुन्हे लवकरात लवकर मागे घेण्याचं आश्वासन दिलं आहे.

 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा