कुरारमधील रस्त्याच्या दुरुस्तीचं काम अर्धवट

 Mumbai
कुरारमधील रस्त्याच्या दुरुस्तीचं काम अर्धवट
कुरारमधील रस्त्याच्या दुरुस्तीचं काम अर्धवट
कुरारमधील रस्त्याच्या दुरुस्तीचं काम अर्धवट
See all
Mumbai  -  

कुरारगाव - मालाड पूर्वेकडील कुरारगाव शिवाजीनगर इथल्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम रखडलं आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या वाहनांना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

तीन महिन्यांपूर्वी शिवाजीनगर इथल्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलं होतं. पूर्वी पेव्हर ब्लॉक असलेला हा रस्ता मध्येच खणून ठेवला. रस्ता खणला मात्र पुन्हा दुरुस्तच करण्यात आला नाही. त्यामुळे शिवाजीनगरमध्ये मधोमधच रस्ता असखल झाला आहे. रस्ता खणल्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्यदेखील वाढलं आहे. रस्ता सरळ नसल्यामुळे दुचाकीस्वारांच्या अपघाताच्या घटनादेखील येथे घडत असल्याचं स्थानिक दुकानदारांनी सांगितलं. रस्ता दुरुस्त करावा यासाठी येथील नामदेव कदम चाळीतील रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक सुनील गुजर आणि पी उत्तर पालिका विभागाकडे तक्रार देखील केली. मात्र कोणीही याकडे लक्ष दिलं नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं.

Loading Comments