खारदांड्यांत “वरळीकर” ठरला सरस

  Mumbai
  खारदांड्यांत “वरळीकर” ठरला सरस
  मुंबई  -  

  खारदांडा - मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवार असूनही केवळ जात प्रमाणपत्र नसल्यामुळे शिवसनेने बाहेरून उमेदवारांची आयात करत वरळीतील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. पण या आयात केलेल्या उमेदवारानेही भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या मतदार संघात दणदणीत विजय मिळवून दिला.

  खारदांडा येथील अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग ९९ मधून शिवसेना आणि भाजपाने अनुक्रमे वरळी आणि वर्सोवा येथील स्थायिक उमेदवारांना खारदांड्याला पाठवले आहे. शिवसेनेने या मतदारसंघातून वरळीतील माजी नगरसेवक संजय अगलदरे यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपाने वर्सोवा येथील जयेंद्र गजेंद्र भानजी यांना उमेदवारी दिली होती. परंतु या खारदांड्यात भाजपाचे कमळ काही फुलले नाही. तिथे धनुष्यबाणच पुन्हा चालला. संजय अगलदरे यांनी ९३६० मते मिळवत भानजी यांचा पराभव करत वर्सोव्याचा रस्ता दाखवला. ही लढत म्हणजे शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षातील नव्हती तर दोन कोळीवाड्यांची होती. त्यामुळे ज्या कोळीवाड्याचा सग्यासोयऱ्यांची संख्या खारदांडा परिसरात अधिक आहे, त्यांचा माणूस विजयी ठरला आहे. खारदांड्यातील नागरिकांनी भानजी ऐवजी अगलदरे यांच्या बाजूने कौल देत त्यांना पुन्हा एकदा नगरसेवक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.