Advertisement

“भाजपचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का?”

भाजपचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का? असा सवाल युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.

“भाजपचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का?”
SHARES

मुंबईतील हिरानंदानी, पवई इथं काही भाजप कार्यकर्त्यांकडून गस्तीवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला बेदम मारहाण करण्यात आली आहे, यातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून इतर दोघे फरार झाले आहेत. त्यावर चर्चा सुरू असताना भाजपचा आपल्या मुंबई पोलिसांवर (mumbai police) इतका राग का? असा सवाल युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई पोलिसांना आधी शिव्या आणि आता तर भाजप कार्यकर्त्यांचा पोलिसांवर थेट हल्ला ?!? भाजपचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का? ह्या घटनेचा निषेध करावा तितका कमी. सगळ्या आरोपींना अशी कठोर शिक्षा व्हावी की पुन्हा कोणाची असली हिम्मत होता कामा नये! असं ट्विट वरुण देसाई यांनी केलं आहे.

भाजपचे (bjp) कार्यकर्ते ट्रिपल सीट एका बाईकवरून प्रवास करत होते. एका किरकोळ अपघातावरून त्यांचा एका महिलेशी पवई, हिरानंदानी इथं वाद झाला. या दरम्यान गस्तीवर असलेले पोलीस हवालदार नितीन करमोडे तिथं पोहचले असता. त्यांनी तेथील सर्वांना पोलीस ठाण्यात जाऊन वाद मिटवण्याची विनंती केली. त्यानुसार तिन्ही आरोपी पोलिसांच्या गाडीत बसले. 

हेही वाचा- भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसाला मारहाण, आरोपींना सोडवण्यासाठी 'या' आमदारानं केला फोन

मात्र अचानक त्यातील एका आरोपीने हातातील कड्याने थेट खैरमाडे यांच्यावरच हल्ला चढवला. या हल्ल्यात खैरमाडे यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली. या प्रकारानंतर या तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून एक जण फरार आहे. पोलिसांना मारहाण केल्या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात आरोपींवर ३५३ , ३३२ , ५०४ , ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन तिवारी ( १८) या अल्पवयीन मुलासोबत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर दिपू तिवारी हा आरोपी फरार असून पवई पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.

विशेष म्हणजे या आरोपींना माणुसकीच्या नात्याने सोडा अशा विनंतीचा फोन चक्क भाजप आमदार राम कदम यांनी केला. कदम यांची ही आॅडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राम कदमांचं हे संभाषण ऐकून सामान्य नागरिक देखील संभ्रमात पडले आहेत. 'तुम्हाला झालेल्या मारहाणीचं मी समर्थन करत नाही. पण माणुसकीच्या दृष्टीकोनातून त्या तिघांच्या भविष्याचा विचार करा. त्या तिघांच्या करिअरचा प्रश्न आहे. त्यांचं लग्नही झालेलं नाही,' असं म्हणत राम कदमांनी तक्रार मागे घेण्याची विनंती केली आहे.

(yuva sena leader varun sardesai criticized bjp over party workers beaten up mumbai police)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा