Advertisement

सिनेटच्या राखीव प्रवर्गांवर युवा सेनेचा झेंडा


सिनेटच्या राखीव प्रवर्गांवर युवा सेनेचा झेंडा
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून उत्सकुता लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या राखीव प्रवर्गांच्या निकालात युवा सेनेने बाजी मारली आहे. राखीव प्रवर्गांचा निकाल बुधवारी रात्री उशिरा जाहीर झाला. यावेळी राखीव प्रवर्गातील पाचही जागांवर युवा सेनेचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. मुख्य म्हणजे, हे पाचही उमेदवार दहा हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकांनी विजयी झाले आहेत.


४० टक्के मतदान

या पदवीधर निवडणुकीसाठी जवळपास ४० टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारपासून सुरू होती. अखेर बुधवारी रात्री उशिरापर्यंत राखीव प्रवर्गातील निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आलं. 


विजयी उमेदवार

रात्री उशिरापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार महिला प्रवर्गातून युवा सेनेच्या शीतल शेठ विजयी झाल्या. तर शितल यांना एकूण १८ हजार ३०८ मते मिळाली आहेत. शीतल पाठोपाठ अभाविपच्या शलाका मिठबावकर यांना २ हजार ६८४ मते मिळाली.

अनुसूचित जाती प्रवर्गातील युवा सेनेचेच निखील जाधव १८ हजार ८८ मतांनी विजयी झाले. तर अनुसूचित जमाती या प्रवर्गातून १८ हजार ७६७ मतांनी धनराज कोहचडे यांनी विजय मिळवला. या प्रवर्गात अभाविपच्या जितेंद्र मेहेर यांनी २३६६ मते मिळवली. तर डीटीएनटी या प्रवर्गातून शशिकांत झोरे यांनी १८ हजार ३५३ मते मिळवत दुसऱ्यांदा सिनेटमध्ये प्रवेश केला आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून राजन कोळंबकर विजयी ठरले असून कोंळंबकर यांची देखील यंदा दुसरी टर्म असणार आहे. कोळंबर यांनी १८ हजाराहून अधिक मते मिळवली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा