धारावीतील 65 झोपडपट्टीवासियांची दिवाळी नव्या घरात

 Sewri
धारावीतील 65 झोपडपट्टीवासियांची दिवाळी नव्या घरात

धारावी - येथील शताब्दीनगरमधील 65 रहिवाशांसाठी यंदाची दिवाळी सुखाची आणि आयुष्याला वेगळं वळण देणारी ठरणार आहे. धारावी पुर्नविकास प्रकल्प, सेक्टर-5 अंतर्गत पीएमजीपी कॉलनीतील 19 मजली टॉवरमधील 65 घरांचा ताबा शुक्रवार, 28 ऑक्टोबरला मालकांना देण्यात येईल. म्हाडा भवनाच्या प्रांगणात सकाळी अकरा वाजता एका कार्यक्रमात म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांच्या हस्ते किल्ल्या मालकांकडे देण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा मुंबई मंडळाकडून देण्यात आली आहे.

Loading Comments