Advertisement

आता डीआरआय करणार विजय मल्ल्याच्या किंगफिशर हाऊसचा लिलाव


आता डीआरआय करणार विजय मल्ल्याच्या किंगफिशर हाऊसचा लिलाव
SHARES

कर्जबुडव्या मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या विर्लेपार्ले येथील 2401. 70 चौ. मीटर जागेवरील किंगफिशर हाऊसचा लिलाव 19 डिसेंबरला होणार आहे. हा लिलाव ई-लिलाव पद्धतीने होणार असून डीआरआय अर्थात डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स करणार आहे. तर किंगफिशर हाऊससाठी 82 कोटींची बोली लावण्यात आली असून 19 डिसेंबरला होणाऱ्या या लिलावाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.


ई-लिलाव पद्धतीने होणार लिलाव

किंगफिशर हाऊसचा लिलाव करण्याचा प्रयत्न याआधी एक दोन नव्हे तर तब्बल पाचवेळा स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने केला आहे. पण पाचही वेळा हा लिलाव अपयशी ठरला. त्यामुळे आता सहाव्यांदा डीआरआयच्या बंगळुरू कार्यालयाकडून हा लिलाव केला जाणार आहे. त्यासाठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून ई-लिलाव पद्धतीने सकाळी 11 ते दुपारी 12 यावेळेत होणार आहे.


82 कोटींची लागली बोली

एसबीआयने पहिल्यांदा किंगफिशर हाऊसचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा यासाठी अंदाजे 150 कोटींची बोली लावण्यात आली. पण या लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने त्यानंतर 132 कोटी, 95 कोटी अशी बोली कमी कमी होत गेली. आता सरतेशेवटी डीआरआयकडून किंगफिशर हाऊससाठी 82 कोटींची बोली लावण्यात आली आहे. बोली लावणाऱ्यांना 50 लाखांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे.


मल्ल्याच्या 9 गाड्यांचाही लिलाव

किंगफिशर हाऊससह मल्ल्याच्या 9 गाड्यांचाही लिलाव यावेळी होणार आहे. या 9 गाड्यांसाठी 4 लाख 94 हजार रुपयांची बोली लावण्यात आली आहे. एसबीआय पाचवेळा लिलावात अपयशी ठरल्याने आता डीआरआयच्या ई-लिलावाला प्रतिसाद मिळतो का? आणि मिळाला तर तो कसा मिळतो हेच पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान किंगफिशर हाऊसचा 1 कोटी 8 लाखांचा मालमत्ता कर थकित आहे. त्यामुळे लिलावात बोली लावत ही मालमत्ता खरेदी करणाऱ्याला 1 कोटी 8 लाख रुपये मुंबई महानगरपालिकेला देय कारवे लागतील हे विशेष.



हेही वाचा

दाऊदच्या प्रॉपर्टीवर शौचालय बांधणार- चक्रपाणी स्वामी

विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक आणि सुटका



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा