Advertisement

लॉकडाऊनमध्ये रिअल इस्टेट मार्केटमध्ये ६० टक्क्यांची वाढ

शहरातील विकासकांनी मागील तिमाहीच्या तुलनेत विक्रीत ६० टक्के इतकी वाढ नोंदवली आहे.

लॉकडाऊनमध्ये रिअल इस्टेट मार्केटमध्ये ६० टक्क्यांची वाढ
SHARES

नॉन ब्रोकरेज कंपनी असलेल्या लीएस फोरास यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार मुंबई महानगर प्रदेशातील रिअल इस्टेट मार्केटमध्ये (जुलै ते सप्टेंबर) या तिमाहीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या अहवालात असं नमूद केलं आहे की, शहरातील विकासकांनी मागील तिमाहीच्या तुलनेत विक्रीत ६० टक्के इतकी वाढ नोंदवली आहे.

ठाण्यात ८ टक्क्यांची घसरण दिसून आली. तर, एमएमआरच्या इतर सर्व भागांच्या विक्रीत ४० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून आली. सप्टेंबरअखेरपर्यंत सुमारे १० हजार २५१ गृहनिर्माण संस्था विकल्या गेल्या. ही आकडेवारी जून तिमाहीत विकल्या गेलेल्या ६ हजार ४५१ गृहनिर्माण संस्थांपेक्षा जास्त आहे. तथापि, विक्री अद्याप २०१२ च्या आकडेवारीच्या मागे आहे. २०१२ मध्ये १६ हजार ९४५ युनिट विक्री होती.

नवी मुंबईत सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली असून या भागाच्या विक्रीत ३१२ टक्के वाढ दिसून आली आहे. तर मुंबईच्या मध्य उपनगरात १२० टक्के वाढ नोंदवली गेली. रिअल इस्टेट मार्केट पुनर्प्राप्तीच्या दिशेनं असल्याचं दिसून येत आहे. कारण एमएमआरमध्ये नवीन प्रक्षेपणांमध्ये २०० टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तथापि, एकूणच गृहनिर्माण युनिट विक्रीप्रमाणेच ही आकडेवारी २०१९ च्या आकडेवारीपेक्षा अजूनही मागे आहे.

लीसेस फोरासचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कपूर यांनी म्हटलं आहे की, वसुली आणि विक्रीतील वाढ ही मुख्यत्वे सरकारकडून मुद्रांक शुल्क कमी करणं आणि बांधकाम व्यावसायिकांकडून विक्रीसाठी देण्यात येणाऱ्या सवलतीमुळे झाली आहे.

ठाणे इथं घसरण दिसून येत आहे, असं सांगताना कपूर म्हणाले, “नवी मुंबईत ३ हजार ५०० चौरस फुट घरासाठी प्रतिचौरस फुटाची किंमत १५ हजार आहे. तर ठाण्यात प्रतिचौरस फुट ८ हजार किंवा त्याहून कमी किंमतीत उपलब्ध आहे."हेही वाचा

पंतप्रधान आवास योजनेला दिली 'इतकी' मुदतवाढ

आयटी रिटर्न भरण्यासाठी आणखी मुदत, 'ही' आहे नवीन तारीख तारीख

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement