मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण


SHARE

मुंबई - चर्चगेटच्या दलाल स्ट्रीट येथे सेंसेक्स आणि निफ्टीच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. मुंबई शेअर बाजारात 1339 अंकांनी आणि निफ्टीत 475 पाॅईंट्सने घसरण झालीय. मागील 7 वर्षानंतर ही सर्वात मोठी घसरण झाल्याचं सांगण्यात आलं. सत्यम घोटाळ्याच्या वेळी एवढी मोठी घसरण झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळे अनेक गुंतवणुकदारांनी शेअर मधुन पैसे काढायला सुरुवात केलीय. तसंच अजून घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. सेंसेक्स कमी होण्याचं प्राथमिक कारण सध्या तरी अमेरिकन निवडणूक सांगितले जात आहे. सध्याच्या घडीला अमेरिकेत मतमोजणी सुरु आहे, आणि डोनाल्ट ट्रँम्प आघाडीवर असल्यानं त्याचा फटका येथील शेअर बाजारावर झाला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या