Advertisement

सेन्सेक्सचा ३३ हजारांचा उच्चांक, केंद्राच्या घोषणांनी शेअर बाजार उसळला


सेन्सेक्सचा ३३ हजारांचा उच्चांक, केंद्राच्या घोषणांनी शेअर बाजार उसळला
SHARES

केंद्र सरकारने जाहीर केलेला बँक रिकॅपिटलायझेशन प्लान, पायाभूत क्षेत्रातील बूस्ट आणि सकारात्मक ग्लोबल संकेतांचा लाभ उठवत बुधवारी मुंबई शेअर बाजारा (बीएसई)चा निर्देशांक सेन्सेक्स ३३ हजारांचा नवा उच्चांक गाठून बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने १० हजारांच्या पलिकडे झेप घेतली.


का नोंदवला उच्चांक?

बुधवारी दिवसअखेर सेन्सेक्सने ४३५ अंकांची विक्रमी वाढ नोंदवत ३३,०४२ अंकांचा पल्ला गाठला, तर निफ्टीने ८८ अंकांची वाढ नोंदवून १०,२९५ अंकांवर मजल मारली.

  1. मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची आर्थिक अवस्था सुधारण्यासाठी २.११ लाख कोटी रुपयांच्या ‘बँक रिकॅपिटलायझेशन प्लान’ची घोषणा केली.
  2. तर, देशातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी 'भारतमाला प्रकल्पां'तर्गत पुढच्या ५ वर्षांत ७ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. या दोन्ही घोषणांमुळे बँक आणि इन्फ्रा सेक्टरच्या कंपन्यांचे शेअर्स जोरदार वधारले.
  3. अमेरिकन बाजार तेजी नोंदवत बंद झाला तसेच आशियातील बाजाराचीही सकारात्मक साथ मिळाली.


९४ हजार कोटी कमावले

  • सरकारी बँकांच्या शेअर्स खरेदीमुळे निफ्टीचा पीएसयू इंडेक्स २८ टक्क्यांनी वाढला 
  • पीएनबी, एसबीआय, कॅनरा बँकसहित १२ सरकारी बँकांचे शेअर्स १८ ते ४० टक्क्यांनी वाढले 
  • याआधारे अवघ्या काही मिनिटांमध्ये गुंतवणूकदारांनी ९४ हजार कोटी रुपयांहून अधिक कमावले
  • सरकारच्या निर्णयानंतर बीएसईवर नोंदणीकृत १३० कंपन्यांच्या शेअर्सनी वर्षभरातील उच्चांक गाठला
  • यामुळे नोंदणीकृत कंपन्यांची एकूण मार्केट कॅप १.४१ लाख कोटी रुपयांवर पोहोचली



हेही वाचा-

बँक खात्याला 'आधार'शी लिंक करणं गरजेचं - आरबीआय


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा