Advertisement

बँक खात्याला 'आधार'शी लिंक करणं गरजेचं - आरबीआय


बँक खात्याला 'आधार'शी लिंक करणं गरजेचं - आरबीआय
SHARES

रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शनिवारी एक निवेदन जारी करत 'अॅन्टी मनी लाँड्रिंग अॅक्ट' अंतर्गत सर्व बँक खाती 'आधार कार्ड'शी लिंक करणं अनिवार्य असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.


वृत्ता तथ्य नाही

एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने आरबीआयकडून आधार कार्ड संदर्भात माहिती मागितली होती. त्यावर आरबीआयने आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं नसल्याचं उत्तर दिल्याचं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. त्यावर खुलासा करताना या वृत्तात तथ्य नसल्याचं आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.


३१ डिसेंबरपर्यंत मुदत

या निवेदनानुसार, 'अॅन्टी मनी लाँड्रिंग अॅक्ट' ' (मेंटेनन्स आणि रेकाॅर्ड) दुसरी दुरूस्ती नियम, २०१७ नुसार सर्व बँक खाती 'आधार कार्ड'शी लिंक करणं आवश्यक आहे. याबाबतची सूचना १ जून २०१७ ला अधिकृत गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार ३१ डिसेंबरपर्यंत सर्व बँक ग्राहकांना बँक खाती आधारशी जोडावीच लागतील.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा