सेन्सेक्स 134 अंकांच्या वाढीसह सर्वोत्तम पातळीवर

  Kala Ghoda
  सेन्सेक्स 134 अंकांच्या वाढीसह सर्वोत्तम पातळीवर
  मुंबई  -  

  आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारपेठेतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने सोमवारी सर्वोत्तम स्तर गाठला. महागाईच्या दरात घट झाल्याने व्यादरामध्ये कपात होण्याची चिन्हे आहेत. त्यातच भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाच्या आधीच मान्सून अंदमानात येऊन दाखल झाल्याने देशांतर्गत बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. परिणामी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 134 अंकांनी वाढून 30,322 या सर्वोत्तम पातळीवर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही 45 अंकांच्या वाढीसह 9445 सर्वोत्तम स्तर गाठला.

  निफ्टी 50 मधील 32 कंपन्यांचे शेअर्स वधारून, तर 19 कंपन्यांचे शेअर्स घट नोंदवून बंद झाले. दिवसभरात बँका, ऑटो, एफएमसीजी, मेटल, रियाल्टी, कॅपिटल गुड्स, पॉवर, ऑईल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. तर आयटी, कन्झ्युमर ड्युरेबल्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा कल होता.

  मीडकॅप शेअर्समध्ये खरेदीचा कल असल्याने बीएसई मीडकॅप इंडेक्स 1.25 टक्क्यांनी वाढून 15040 वर पोहोचला. निफ्टी मीडकॅप 100 इंडेक्स देखील 0.91 अंकांनी वाढून बंद झाला. तर बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स 0.78 अंकांनी वाढून बंद झाला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.