Advertisement

गुंतवणूकदारांचे १ लाख कोटी बुडाले, सेन्सेक्स ४५३ अंकांनी आपटला


गुंतवणूकदारांचे १ लाख कोटी बुडाले, सेन्सेक्स ४५३ अंकांनी आपटला
SHARES

गुरूवारी दुपारी वित्तीय तुटीची आकडेवारी जाहीर होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल ४५३ अंकांनी आपटून ३३,१४९ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३५ अंकांनी घसरून १०,२२७ वर अाला. यामुळे गुंतवणूकदारांचे १ लाख कोटी रुपये बुडाले.


कुठल्या शेअर्समध्ये घसरण?

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ७ महिन्यांमध्ये वित्तीय तुटीचा आकडा ९६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने शेअर्समध्ये विक्रीचा कल पाहायला मिळाला. बँक, आॅटो, फायनांन्स सर्व्हिस, आयटी, मेटल, फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली. एकट्या खासगी आणि सरकारी बँकेचा निफ्टी ५४९ अंकांनी घसरून २५,२४६.८५ वर आला. यामुळे सेन्सेक्सला मोठा फटका बसला.


गुंतवणुकदारांना फटका

परिणामी गुंतवणूकदारांचे १ लाख कोटी रुपये बुडाले. बुधवारी बीएसईवर नोंदणीकृत एकूण कंपन्यांची मार्केट कॅप १,४७,०४,५८७.५४ कोटी रुपये होती. त्यात गुरूवारी दिवसअखेर १,०७,९३१.५४ कोटी रुपयांची घट होऊन मार्केट कॅप १, ४५, ९६,६५६ कोटी रुपयांवर आली.


कुठल्या कारणांमुळे घसरण?

  • वित्तीय तुटीच्या आकडेवारीनंतर बाजारात निराशा
  • केंद्राने आर्थिक वर्षासाठी ५.४६ लाख कोटी रुपयांच्या वित्तीय तुटीचं लक्ष्य ठेवलं
  • पण ७ महिन्यानंतर वित्तीय तूट ५.२ लाख कोटींपर्यंत (९६ टक्के) पोहोचली
  • बँक रिकॅपिटलायझेशन प्लान उशीरा पोहोचण्याची शक्यता
  • एसबीआयने १ झिपाॅझिट रेटमध्ये १ टक्का व्याजदरवाढ केली
  • यामुळे व्याजदर कपातीची शक्यता लांबणीवर पडण्याची शक्यता
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा