Advertisement

सेन्सेक्समध्ये ५६१ अंकांची पडझड, गुंतवणूकदारांच्या अडीच लाख कोटींचा चुराडा


सेन्सेक्समध्ये ५६१ अंकांची पडझड, गुंतवणूकदारांच्या अडीच लाख कोटींचा चुराडा
SHARES

अमेरिका आणि आशियातील बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतांमुळे तब्बल १२०० अंकांपर्यंत गडगडलेल्या मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने शेवटच्या काही तासांत ७१३ अंकांची रिकव्हरी करत मोठी पडझड होण्यापासून बचाव केला. दिवसअखेर ५६१ अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स ३४,१९६ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १६८ अंकांनी घसरून १०,४९८ अंकांवर बंद झाला. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांच्या ५ लाख कोटी रुपयांचा चुराडा झाल्याचं म्हटलं जात आहे.

अमेरिकन शेअर बाजारात मागील ६ वर्षांतील घसरण सोमवारी नोंदवण्यात आली. परिणामी मंगळवारी बाजार सुरू होताच सेन्सेक्सने १२७४ अंकांची आपटी खाल्ली. तर निफ्टी देखील ३९० अंकांनी पडला. ही घसरण 'इंट्रा डे' व्यवहारातील मागील १४ महिन्यांमधील सर्वात मोठी घसरण आहे. यापूर्वी ११ नोव्हेंबर २०१६ मध्ये सेन्सेक्स दिवसभराच्या व्यवहारात १६८९ अंकांनी खाली आला होता.



अडीच लाख कोटींचं नुकसान

सलग होणाऱ्या घसरणीकडे पाहता गुंतवणूकदारांनी नफा काढून घेण्यासाठी सकाळच्या सत्रातच शेअर्स विक्रीला सुरूवात केली. यामुळे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्माॅल कॅप अशा सर्वच सेगमेंटमधील शेअर्सची मोठी विक्री झाली. यामुळे गुंतवणूकदारांच्या किमान ५ लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला.

सोमवारी बीएसईवरील नोंदणीकृत कंपन्यांची एकूण मार्केट कॅप १,४७,९५,७४७ कोटी रुपये होती. ती मंगळवारी दुपारपर्यंत ५,२२.०५४ कोटी रुपयांनी कमी झाली. परंतु बाजार बंद होण्याअगोदर झालेल्या रिकव्हरीमुळे नुकसान निम्म्याने कमी होऊन २,७३,२६० कोटी रुपयांवर आलं.


सेन्सेक्सची दिवसभरातील सर्वात मोठी घसरण

तारीख
घसरण
२२ जानेवारी २००८
२२७२.९३
२१ जानेवारी २००८
२०६२.२
२९ सप्टेंबर १९९७
१९६१.२१
१७ आॅक्टोबर २००७
१७४३.९६
२४ आॅगस्ट २०१५
१७४१.३५
११ नोव्हेंबर २०१६
१६८९
६ फेब्रुवारी २०१८
१२७४

 
 
हेही वाचा-

म्हणून गडगडला सेन्सेक्स



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा