सेन्सेक्सचा पुन्हा नवा उच्चांक, 30658 ची पातळी गाठली

  Kala Ghoda
  सेन्सेक्सचा पुन्हा नवा उच्चांक, 30658 ची पातळी गाठली
  मुंबई  -  

  देशांतर्गत शेअर बाजारांनी बुधवारी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत नवा उच्चांक गाठला आहे. दिवसअखेर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 6 अंकांची वाढ नोंदवत 9518 हा नवा उच्चांक गाठला. तर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने 76 अंकांची वाढ नोंदवून 30,658 ची सर्वोत्तम पातळी गाठली.

  दिवसभराच्या व्यवहारात निफ्टीने एकावेळेस 9528 चा आणि सेन्सेक्सने 30,677.8 चा स्तर गाठला होता. परंतु पीएसयू बँकांच्या शेअर्समध्ये दिवसअखेर जोरदार विक्री झाल्याने त्याचा फटका शेअर बाजाराला बसला. सर्वाधिक तेजी मेटल आणि पॉवर सेक्टरच्या शेअर्समध्ये दिसली. तर ऑटो शेअर्समध्ये तेजी सुरूच होती.

  निफ्टीतील 27 शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली. सर्वाधिक वाढ टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये होती. सद्यस्थितीत टाटा स्टीलचे शेअर्स 8.6 टक्क्यांच्या वाढीसह व्यवसाय करत असून इंडियाबुल्स हाऊसिंग साधारण 3 टक्के, टाटा पॉवर आणि आयसीआयसीआय बँक प्रत्येकी 2 टक्के, टाटा मोटर्स 1.9 टक्क्यांच्या वाढीसह व्यवसाय करत आहेत. निफ्टीत सर्वाधिक घसरण टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये झाली असून या कंपनीचे शेअर्स 2.72 टक्क्यांनी घसरले आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.