Advertisement

सेन्सेक्सची ३८,६९४ अंकांवर झेप


सेन्सेक्सची ३८,६९४ अंकांवर झेप
SHARES

पाॅझिटीव्ह ग्लोबल संकेतांच्या आधारे चौतरफा खरेदी झाल्याने मुंबई शेअर बाजारा (बीएसई) च्या निर्देशांकाने सोमवारी ऐतिहासिक उच्चांक गाठला. एवढंच नव्हे, तर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी महिन्याभरात नवव्यांदा सर्वोत्तम पातळी गाठली.

दिवसभरात सेन्सेक्स ४४२ अंकांनी उसळून ३८,६९४ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३५ अंकांनी उसळून ११,६९२ वर बंद झाला. दिवसभराच्या सत्रात सेन्सेक्स ३८,७३६.८८ अंकांचा, तर निफ्टीने ११, ७०० अंकांचा स्तर गाठला होता. बीएसईचा बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्समधील ३० पैकी २९ कंपन्यांच्या शेअर्सनी वाढ नोंदवली.


सेन्सेक्सचा उच्चांक

  • २७ आॅगस्ट: ३८,७०० च्या स्तराला स्पर्श करून ३८,६९४ अंकांवर बंद
  • २३ आॅगस्ट: ३८,४८७.६३ अंकांवर बंद
  • २१ आॅगस्ट: ३८,४०० च्या स्तराला स्पर्श करून ३८,४०२.९६ वर बंद
  • २० आॅगस्ट: ३८,३४०.६९ अंकांवर बंद
  • ०९ आॅगस्ट: ३८,०७६.२३ अंकांवर बंद
  • ०८ आॅगस्ट: ३७,९३१.४२ अंकांवर बंद
  • ०७ आॅगस्ट: ३७,८७६.८७ अंकांवर बंद
  • ०६ आॅगस्ट: ३७,८०५.२५ अंकांवर बंद
  • ०१ आॅगस्ट: ३७,७११.८७ अंकांवर बंद



मीडकॅप, स्माॅलकॅप शेअर्स वधारले

सोमवारी लार्जकॅप कंपन्यांच्या शेअर्ससोबतच मीडकॅप आणि स्माॅलकॅप शेअर्सची जोरदार खरेदी झाली. बीएसईचा मीडकॅप इंडेक्स १.०७ टक्क्यांनी वाढून बंद झाला. तर निफ्टीचा मीडकॅप इंडेक्स १.१९ टक्क्यांनी वधारला. सोबतच स्माॅलकॅप इंडेक्स ०.०७ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.


कुठले शेअर्स वधारले, घसरले?

मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये भारती एअरटेल, पाॅवरग्रीड, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, इंफोसीस, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, एल अँड टी, मारूती, ओएनजीसी, एचयूएल, एचडीएफसी बँक, टीसीएस आणि एचडीएफसीचे शेअर्स ०.४३ ते ३.९३ टक्क्यांनी वधारले तर सन फार्माचे शेअर्स १.२५ टक्क्यांनी घसरले.



हेही वाचा-

नक्की वाचा, कर बचतीच्या १६ जबदरस्त योजना!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा