Advertisement

नक्की वाचा, कर बचतीच्या १६ जबदरस्त योजना!

विम्यामध्ये पैसे टाकावेत की एसअायपी करावी?, गृह कर्ज घ्यायचे? की एकाच योजनेत मोठी रक्कम गुंतवायची? असे अनेक प्रश्न करदात्यांना पडतात. पण नक्की कुठे गुंतवणूक करून कर वाचवायचा याची माहिती त्यांना मिळत नाही

नक्की वाचा, कर बचतीच्या १६ जबदरस्त योजना!
SHARES

नवीन अार्थिक वर्ष सुरू होण्याअगोदरपासूनच अापल्या सर्वांना कर भरण्याची चिंता सतावू लागते. मग अापण कर वाचवण्याचे मार्ग शोधू लागतो. विम्यामध्ये पैसे टाकावेत की एसअायपी करावी?, गृह कर्ज घ्यायचे? की एकाच योजनेत मोठी रक्कम गुंतवायची? असे अनेक प्रश्न पडतात. पण नक्की कुठे गुंतवणूक करून कर वाचवायचा याची माहिती करदात्यांना मिळत नाही. त्यामुळे या लेखातून अाम्ही चांगला परतावा देणारी गुंतवणूक अाणि कर बचत अशा दुहेरी मेळ घालणाऱ्या योजनांची माहिती देत अाहोत.  


१) ईएलएसएस कर बचत म्युच्युअल फंड

 • ईएलएसएस ही कर बचतीची म्युच्युअल फंडांची एक योजना अाहे.  
 •  या योजनेत वार्षिक १ लाख ५० हजार रुपयांची कर सूट मिळू शकते.
 • इतर म्युच्युअल फंडांप्रमाणे या फंडाचाही परतावा (रिटर्न) निश्चीत नाही. या फंडामधून तुम्हाला १२ ते १८ टक्के परतावा मिळू शकतो.
 • या फंडाचा लाॅक इन पिरियड ३ वर्षांचा अाहे. म्हणजे ३ वर्षाच्या अात या फंडातून तुम्हाला तुमची गुंतवणूक काढता येणार नाही.
 • अॅक्सिस लाँग टर्म इक्विटी, रिलायन्स टॅक्स सेवर फंड. डीएसपी बीअार टॅक्स सेवर फंड अादी ईएलएसएस प्रकारातील टाॅपचे फंड अाहेत. 
 • कर बचत अाणि उत्तम परतावा यासाठी ईएलएसएस कर बचत म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा एक उत्कृष्ट प्रकार अाहे.
२) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (ppf)

 • कर बचतीचा हा भारतातील सध्याचा एक उत्कृष्ट प्रकार अाहे.
 • पीपीएफमधील १ लाख ५० हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक कर बचतीस पात्र अाहे.
 • यावर मिळणारे व्याजही करमुक्त अाहे.
 • केंद्र सरकार ही योजना राबवत असून यावरील व्याजदर सध्या ७.८ टक्के अाहे.
 • कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत पीपीएफ खाते उघडून गुंतवणूक सुरू करता येते.
 • या योजनेत १५ वर्षांचा लाॅक इन पिरियड अाहे.


३) सुकन्या समृद्धी योजना

 • ही योजना फक्त मुलींसाठी अाहे.
 • पालक मुलीच्या नावाने खाते खोलून दर वर्षी जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
 • या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते.
 • मुदत संपल्यानंतर मिळणारे व्याजही करमुक्त अाहे.


४) बँक मुदत ठेवी योजना  (tax saver bank fd schemes)

 • कर बचतीचा हा एक जुना अाणि उत्तम पर्याय मानला जातो.
 • अनेक बँकांच्या मुदत ठेवीच्या योजना अाहेत. या मुदत ठेवीच्या रकमेवर कर सूट मिळते.
 • या योजनेत गुंतवणूक करमुक्त असली तरी मिळणाऱ्या व्याजावर मात्र कर अाकारला जातो.
 • या योजनांचा लाॅक इन पिरियड ५ वर्षांचा अाहे.
५) ज्येष्ठ नागरिक बचत योजना 

 • ही कर बचतीची योजना ज्येष्ठ नागरिकांना खात्रीशीर परताव्याची हमी देते.
 • ६० वर्षांवरील नागरिकाला कर बचतीसाठी हे खाते खोलता येते.
 • ५ वर्ष मुदतीची ही योजना अाहे.
 • प्रत्येक तिमाही अखेरीस व्याज मिळते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी कर बचतीसाठी ही योजना उत्तम मानली जाते.
 • जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा १५ लाख रुपये अाहे.
 •  मिळणाऱ्या व्याजावर कर अाकारला जातो.
 • मुदतीअाधी खाते १ वर्षानंतर  बंद करता येते. मात्र, यासाठी गुंतवणूक रकमेच्या दीड टक्के रक्कम दंड म्हणून अाकारली जाते.


६) राजीव गांधी इक्विटी सेविंग स्कीम (RGESS)

 • नवीन गुंतवणूकदारांसाठी ही कर बचत करणारी योजना अाहे.
 • ज्यांचं वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपये अशा प्रथमच गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या योजनेत कर सवलत मिळते.
 • प्रत्येक अार्थिक वर्षात जास्तीत जास्त ५० हजार रुपयांची गुंतवणूक करता येते.
 • बीएसई १०० मधील शेअर्समध्ये अाणि  RGESS म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते.
 • गुंतवणुकीच्या ५० टक्के रकमेवर कर सवलत मिळते. म्हणजे नवीन गुंतवणूकदाराने प्रथमच ५० हजार रुपयांची गुंतवणूक बीएसई १०० मधील शेअर्स अाणि  RGESS म्युच्युअल फंडात केल्यास २५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळेल.


७) राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) 

 • निवृत्तीसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी अाणि कर बचतीसाठी हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय अाहे.
 •  या योजनेत गुंतवणूकदारांना शेअर्स, बाँड्समध्ये गुंतवणूक करता येते.
 • वर्षाला कमीत कमी ६ हजार रुपये अाणि जास्तीत जास्त कितीही रक्कम या योजनेत गुंतवता येते.
 • दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते.


८)  राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 

 • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजना पोस्ट अाॅफिसकडून चालवली जाते.
 • हा गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय मानला जातो.
 • कमीत कमी ५०० रुपये अाणि जास्तीत कितीही रक्कम या योजनेत गुंतवता येते
 • ५ वर्षासाठीची ही बचत प्रमाणपत्रे असून यावर ७.८ टक्के व्याज मिळते. दर ३ महिन्यांनी अर्थ मंत्रालय नवीन व्याजदर जाहीर करते.
 •  गुंतवणूक करमुक्त असली तरी मिळणारे व्याज करपात्र अाहे.


९) युनिट लिंक्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन (ULIP)

 • विमा संरक्षण, गुंतवणूक अाणि कर बचत असा तिहेरी लाभ देणारी ही योजना अाहे.
 • विमा संरक्षणासह शेअर्समधील गुंतवणूकीचा फायदा या योजनेत मिळतो.
 •  ही योजना राबवणारी कंपनी गुंतवणुकीचा काही हिस्सा शेअर बाजारात गुंतवते. 
 •  योजनेचा लाॅक इन पिरियड ३ वर्ष अाहे.


१०) जीवन विमा योजना

 • अनेक कंपन्या जीवन विमा योजना देतात
 • सर्व प्रकारच्या जीवन विमा योजनांच्या प्रीमिमवर कर सवलत मिळते.
 • पारंपारिक विमा, मुदतीचा विमा, युलिप, मनी बॅक अादी सर्व योजनांवर कर सूट मिळते. 
 • कर बचतीसाठी या योजना चांगल्या मानल्या जातात.
 • विमा संरक्षणासह परतावा मिळण्याची हमी या योजना देतात.


११) गृहकर्ज

 • गृहकर्ज रकमेच्या परतफेडीवर २ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कर सूट मिळते.
 • गृहकर्ज व्याजाच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कर सूट दिली जाते.
 • जर तुमचं पहिलंच घर असेल तर ५० हजार रूपयांच्या व्याजाच्या रकमेवर अतिरिक्त कर सूट मिळेल. १२) पेन्शन फंड्स

 • सेवानिवृत्तीनंतर उत्पन्न मिळवण्याचा मार्ग म्हणजे पेन्शन फंड.
 • या फंडांमधील गुंतवणूकीवर कर सूट मिळते.

१३) शाळेची फी

 • मुलांच्या शाळा, काॅलेज, विद्यापिठातील शिक्षणासाठी भरलेल्या फी वर  पालकांना कर सवलत मिळते.
 • जास्तीत जास्त २ मुलांच्या फी वरच कर सूट मिळेल.
 • शाळेला दिलेला विकास निधी अाणि इतर दिलेल्या शुल्कावर मात्र कर सवलतीचा दावा पालकांना करता येत नाही.


१४) घर भाडे

 • तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर कंपनीकडून मिळणारा घरभाडे भत्ता कर सवलतीस पात्र असतो.


१५) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ)

 • कर्मचाऱ्याच्या नावाने कंपनी ईपीएफमध्ये पैसे जमा करते.
 • यामध्ये कर्मचाऱ्याचा हिस्सा १२ टक्के अाणि तेवढाच हिस्सा कंपनीचाही असतो.
 • यामधील कर्मचाऱ्याचा हिश्श्यावर कर सवलत मिळते.
१६) व्हीपीएफ (Voluntary Provident fund – VPF) 

 • ईपीएफमध्ये कर्मचाऱ्याला अापल्या मूळ वेतनाच्या १२ टक्क्यापेक्षा अधिक रक्कमही जमा करता येते.
 • १२ टक्के असलेल्या अनिवार्य कपातीपेक्षा अधिक जितकी रक्कम जमा करेल त्याला  व्हीपीएफ म्हटले जाते.
 • या रकमेवर कर सवलत मिळते.हेही वाचा -

सिडकोकडूनच महारेराचं उल्लंघन, नोंदणीशिवाय काढली जाहिरात

सर्वात इनोव्हेटिव्ह शहरांच्या यादीत मुंबई 92 व्या स्थानी 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा