सेन्सेक्सची पुन्हा विक्रमी नोंद, 31273 च्या सर्वोच्च स्तरावर

 Mumbai
सेन्सेक्सची पुन्हा विक्रमी नोंद, 31273 च्या सर्वोच्च स्तरावर
Mumbai  -  

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मजबूत संकेत आणि जोरदार खरेदीमुळे शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने नवा उच्चांक गाठला. दिवसअखेर 136 अंकांची वाढ नोंदवून सेन्सेक्स 31273 या सर्वोच्च पातळीवर विराजमान झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 37 अंकांची वाढ नोंदवून 9653 चा टप्पा गाठला आहे. निफ्टीने पहिल्यांदाच 9650 चा पल्ला पार केला आहे. चालू आठवड्यात सेन्सेक्सने तब्बल तिसऱ्यांदा सर्वोत्तम दर गाठत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.

दिवसभराच्या व्यवहारांत सर्वाधिक तेजी फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये पाहायला मिळाली. या कंपन्यांचे शेअर्स 3.13 टक्क्यांपर्यंत वाढले. याशिवाय हिरो मोटोकॉर्प, सिप्ला, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, टीसीएस, ल्युपिन, सन फार्मा, कोल इंडिया, आयटीसी, एसबीआय, एचडीएफसीच्या शेअर्सची चांगली खरेदी झाली. तर एचयूएल, बजाज ऑटो, एल अँड टी, पॉवर ग्रीड, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये विक्रीचा कल होता.

Loading Comments