Advertisement

सेन्सेक्स, निफ्टी वधारले; रेपो दर वाढीचा परिणाम नाही


सेन्सेक्स, निफ्टी वधारले;   रेपो दर वाढीचा परिणाम नाही
SHARES

रिझर्व्ह बँक अाॅफ इंडियाने बुधवारी चार वर्षानंतर प्रथमच रेपो दरात वाढ केली.  मात्र, याचा परिणाम शेअर बाजार दिसून अाला नाही. दिवसअखेरीस सेन्सेक्स २७६ अंकाने वधारून ३५ हजार १७९ वर बंद झाला. तर निफ्टीही ९१ अंकांची वाढ नोंदवत १० हजार ६८५ वर स्थिरावला. बँक, वाहन, एफएमजीसी, अायटी, धातू, औषध अाणि रियल्टी शेअर्समधील तेजीने बाजाराला चांगला सपोर्ट मिळाला. 


तेजीने सुरूवात 

रिझर्व्ह बँकेने रेपो दर ६ टक्क्यांवरून वाढवून ६.२५ टक्के केला अाहे. त्यामुळे बँकांची कर्जे महागणार अाहेत. मात्र, याचा नकारात्मक परिणाम देशातील शेअर बाजारावर दिसून अाला नाही. शेअर बाजाराने दिवसभर तेजी नोंदवली. सेन्सेक्स सकाळी २९ अंकांच्या वाढीने ३४ हजार ९३२ वर उघडला. तर निफ्टीनेही १० अंकांच्या तेजीने सुरूवात केली.

मिडकॅप, स्मॉलकॅपची चांगली कामगिरी

लार्जकॅप शेअर्सबरोबर बुधवारी  मिडकॅप अाणि स्मॉलकॅप शेअर्सनेही चांगली कामगिरी नोंदवली. मिडकॅपमध्ये अारकॉम, आयडीएफसी बँक, एनएलसी इंडिया, गृह फायनान्स, इंडियन बँक, श्रीराम सिटी यूनियन, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स, गोदरेज एग्रो, नॅशनल अॅल्युमीनियम, टोरेंट पाॅवर, अदानी पाॅवर, यूनियन बँक, पीएनबी हाऊसिंग, जेएसडब्ल्यू एनर्जी, यूबीएल, बीईएल, एबीबी अादी कंपन्यांचे शेअर्स वधारले.


हेही वाचा -

कर्जे महागणार, अारबीयकडून रेपो दरात वाढ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा