Advertisement

शेअर बाजारात त्सुनामी; सेन्सेक्स १५०० अंकांनी कोसळला

एका अफवेमुळे दिवान हाऊसिंग फायनान्स (डीएचएफएल) चा शेअर्स तब्बल ६० टक्क्यांनी कोसळल्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये कंपनीचे ११ हजार कोटी रुपये साफ झाले.

शेअर बाजारात त्सुनामी; सेन्सेक्स १५०० अंकांनी कोसळला
SHARES

शुक्रवारी सकाळी तेजीत उघडलेल्या भारतीय शेअर बाजारात दुपारी अचानक त्सुनामी अाली. सेन्सेक्स, निफ्टी जोरदार अापटल्याने गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचे शेअर्स घसरल्याने सेन्सेक्स तब्बल १४९५ अंकांनी कोसळून ३५ हजार ९९३ पर्यंत अाला. तर निफ्टीनेही ४८० अंकांची मोठी घसरण नोंदवली. यामध्ये गुंतवणूकदारांची दाणादाण उडाली. मात्र, त्यानंतर ही जोरदार घसरण कायम न राहता बाजारांनी वेगाने उभारी घेतली. दिवसाअखेरीस सेन्सेक्स २८० अंकाने घसरून ३६ हजार ८४२ वर तर निफ्टीने ९१ अंकाने घसरून ११ हजार १४३ वर बंद झाला.


एका अफवेने ११ हजार कोटी साफ

एका अफवेमुळे दिवान हाऊसिंग फायनान्स (डीएचएफएल) चा शेअर्स तब्बल ६० टक्क्यांनी कोसळल्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये कंपनीचे ११ हजार कोटी रुपये साफ झाले. डीएचएफएलने बाँड परताव्याची परतफेड न केल्याची अफवा पसरल्याने कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारी २ वर्षामधील नीचांक गाठला. या मोठ्या पडझडीनंतर व्यवस्थापनाने परताव्याची परतफेड करण्याची ग्वाही दिल्यानंतर कंपनीचा शेअर्स सावरला. डीएचएफएलशिवाय  कॅन फिन होम्स,  रिलायन्स होम फायनान्स, गृह फायनान्स, रेपको होम फायनान्स अाणि एलअायसी हाऊसिंग फायनान्स अादी कंपन्यांचे शेअर्समध्ये १२ ते १८ टक्के कोसळले. 

अारबीअायचा निर्णय महागात 

रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय येस बँकेला चांगलाच महागात पडला. अारबीअायने येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांच्या कार्यकाल कमी करून अवघा ४ महिने म्हणजे ३१ जानेवारी २०१९ पर्यंत केला. या निर्णयानंतर येस बँकेचा शेअर्स ३४ टक्क्यांनी कोसळला. त्यामुळे काही मिनिटांमध्ये बँकेच्या गुंतवणूकदारांचे तब्बल २५ हजार कोटी रुपये बुडाले. 



हेही वाचा - 

सेन्सेक्स ५०९ अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी बुडाले




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा