Advertisement

सेन्सेक्स ५०९ अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी बुडाले

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल ५०९ अंकांनी गडगडून ३७,४३१ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५१ अंकांनी घसरून ११, २८७ वर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्समधील १८०० हून जास्त शेअर्स कोसळले.

सेन्सेक्स ५०९ अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी बुडाले
SHARES

कमकुवत रूपया आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ट्रेड वाॅर भडकण्याची चिन्हे असल्याने मंगळवारी देशांतर्गत बाजारांत मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल ५०९ अंकांनी गडगडून ३७,४३१ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५१ अंकांनी घसरून ११, २८७ वर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्समधील १८०० हून जास्त शेअर्स कोसळले. तर एनएसईवरील सर्व ११ इंडेक्स लाल निशाणाखाली बंद झाले.


रूपयातील घसरण कारणीभूत

मंगळवारी रुपयाच्या घसरणीचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर पडला. डाॅलरच्या तुलनेत रुपयाने ७२.७२ ची ऐतिहासीक नीच्चांकी पातळी गाठली. परिणामी शेअर बाजारात जोरदार विक्री पाहायला मिळाली. याशिवाय एप्रिल-जून तिमाहीतील वित्तीय तूट वाढून १५८० कोटी डाॅलरवर पोहोचली. गेल्यावर्षी याच तिमाहीत वित्तीय तूट १५०० कोटी डाॅलर इतकी होती.


गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी बुडाले

कमकुवत रुपयामुळे मागच्या २ दिवसांमध्ये सेन्सेक्स ९७७ अंकांनी, तर निफ्टी ३०२ अंकांनी घसरले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांनी किमान ४ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. शुक्रवारी को बीएसई वर लिस्टेड कंपन्यांची एकूण मार्केट कॅप १, ५७, ३९, ७८७. ८४ कोटी रुपये होती. तर मंगळवारी मार्केट कॅप घसरून १, ५३, ३१, ०२९ वर आली. यामध्ये ४, ०८, ७५८.८४ कोटी रुपयांची घट झाली.


कुठल्या शेअर्समध्ये घसरण?

दिवसभरात कोल इंडिया, एनटीपीसी, इन्फोसिस, एम अँड एम, एशियन पेंट्समधील शेअर्समध्ये वाढ झाली. तर एचडीएफसी बँक, आयटीसी, आरआयएल, आयसीआसीआय बँक, टीसीएस, कोटक बँक, एचडीएफसी, मारूती, टाटा स्टील, टाटा मोटर्स, विप्रो इ. कंपन्यांचे शेअर्स घसरले.



हेही वाचा-

वॉलमार्ट-फ्लिपकार्ट व्यवहाराविरोधात २८ सप्टेंबरला व्यापाऱ्यांचा भारत बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा