Advertisement

वॉलमार्ट-फ्लिपकार्ट व्यवहाराविरोधात २८ सप्टेंबरला व्यापाऱ्यांचा भारत बंद

फ्लि‍पकार्ट अाणि वॉलमार्टमधील व्यवहाराविरोधात देशभरातील व्यापारी २८ सप्टेंबरला देशव्यापी बंद पुकारणार अाहेत. तसंच रिटेलमध्ये एफडीअायला परवानगी देऊ नये या मागणीसाठी १५ सप्टेंबरपासून व्यापारी दिल्लीमधून रथ यात्रा काढणार अाहेत.

वॉलमार्ट-फ्लिपकार्ट व्यवहाराविरोधात २८ सप्टेंबरला व्यापाऱ्यांचा भारत बंद
SHARES

फ्लि‍पकार्ट अाणि अमेरिकन कंपनी वॉलमार्टमधील कराराला कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडि‍या (सीसीअाय) ने मंजुरी दिली अाहे. त्यामुळे वाॅलमार्टकडून १६ अब्ज डाॅलरमध्ये फ्लि‍पकार्टची ७७ टक्के हिस्सेदारी घेण्याचा रस्ता मोकळा झाला अाहे. मात्र, या कराराला देशभरातील व्यापाऱ्यांनी विरोध केला अाहे. २८ सप्टेंबरला भारत बंदची हाक व्यापारी संघटनांनी दिली अाहे. तर कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ही संघटना सीसीअायच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार अाहे.


१५ सप्टेंबरपासून रथ यात्रा 

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे सचीव  प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितलं की, देशभरातील व्यापारी २८ सप्टेंबरला देशव्यापी बंद पुकारणार अाहेत. याशिवाय फ्लि‍पकार्ट अाणि वॉलमार्टमधील या कराराविरोधात पाठिंबा मिळवण्यासाठी तसंच रिटेलमध्ये एफडीअायला परवानगी देऊ नये या मागणीसाठी १५ सप्टेंबरपासून व्यापारी दिल्लीमधून रथ यात्रा काढणार अाहेत. ही रथ यात्रा देशातील २८ राज्यांमधून जाईल. तर १६ डिसेंबरला दिल्लीत राष्ट्रीय व्यापारी रॅली काढण्यात येणार अाहे. 


व्यापाऱ्यांचा विरोध का?

 वॉलमार्ट देशात सध्या अाॅनलाइन मार्केटमार्फत प्रवेश करत अाहे. मात्र, अागामी काळात ही कंपनी अाॅफलाइन बाजारातही उतरेल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं अाहे. खंडेलवाल यांच्या म्हणण्यानुसार, अशा कंपन्या जगातून कुठुनही सामान अाणतील अाणि देशाला डंपिंग ग्राउंड बनवतील. देशातील किरकोळ व्यापाऱ्यांसाठी समान स्पर्धा नसेल. या स्पर्धेत ते मागे पडतील. त्यांच्या व्यवसाय नष्ट होईल. सध्या देशात ७ कोटी किरकोळ व्यापारी अाहेत. यातील जवळपास ३ कोटी व्यापाऱ्यांना या व्यवहाराचा थेट फटका बसणार अाहे. 



हेही वाचा -

अायडिया, वोडाफोनचे विलीनीकरण पूर्ण; बनली सर्वात मोठी मोबाइल कंपनी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा