Advertisement

अायडिया, वोडाफोनचे विलीनीकरण पूर्ण; बनली सर्वात मोठी मोबाइल कंपनी

अायडिया अाणि वोडाफोनच्या एकत्रीकरणानंतर तयार झालेली नवीन कंपनी अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ इन्फोकाॅमसाठी एक मोठी स्पर्धक असेल.

अायडिया, वोडाफोनचे विलीनीकरण पूर्ण; बनली सर्वात मोठी मोबाइल कंपनी
SHARES

अायडिया सेल्युलर अाणि वोडाफोन इंडिया या देशातील दोन मोठ्या दूरसंचार कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली अाहे. दोन्ही कंपन्या एकत्र अाल्यामुळे तयार झालेली नवीन कंपनी ही अाता देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनली अाहे.  

दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओचा प्रवेश झाल्यानंतर देशात दूरसंचार कंपन्यांमध्ये किंमत युद्ध भडकलं होतं. या पार्श्वभूमीवर दूरसंचार क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्या एकत्र येणं ही मोठी घडामोड मानली जात अाहे.  


जिओसाठी स्पर्धक

अायडिया अाणि वोडाफोनच्या एकत्रीकरणानंतर तयार झालेली नवीन कंपनी अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ इन्फोकाॅमसाठी एक मोठी स्पर्धक असेल. जिओच्या अागमनानंतर जगभरातील मोबाइल फोन बाजारात एकत्रीकरणाची सुरूवात झाली होती. त्यानंतर वोडाफोन अाणि अायडिया या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये एकत्र येण्यास राजी झाल्या.

एअरटेलला मागे टाकलं

अायडियाने शुक्रवारी म्हटलं की, नवीन कंपनी अायडिया वोडाफोनची दूरसंचार बाजारातील महसूलात ४० टक्के हिस्सेदारी असेल. या कंपनीचे तब्बल ४० कोटी ग्राहक अाहेत. ग्राहकांच्या संख्येत या कंपनीने भारती एअरटेलला मागे टाकलं अाहे.


नवीन कंपनीत १२ संचालक

नवीन कंपनीच्या संचालक मंडळात अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला अाणि मुख्य कार्यकारी अधिकारी बालेश शर्मा यांच्यासह १२ संचालक असतील. हिमांशु कपानिया यांनी अायडिया सेल्युलरच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अगोदरच राजीनामा दिला अाहे. मात्र, ते नवीन कंपनीत बिगर कार्यकारी संचालक म्हणून राहतील. 



हेही वाचा - 

नक्की वाचा, कर बचतीच्या १६ जबदरस्त योजना!

नोटबंदीतील ९९ टक्के नोटा बँकांकडे जमा; अारबीअायची अाकडेवारी




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा