सेन्सेक्समध्ये 118 अंकांची घसरण

  Mumbai
  सेन्सेक्समध्ये 118 अंकांची घसरण
  मुंबई  -  

  नवीन विक्रम रचून दिवसाची सुरूवात करणाऱ्या मुंबई शेअर बाजारात मंगळवारी दिवसभर नफा वसुलीचा कल दिसून आला. निफ्टीने पहिल्यांदा रेकॉर्ड 9700 चा स्तर गाठला, तर सेन्सेक्सनेही 31400 पलिकडे झेप घेतली. मात्र बाजार बंद होण्याच्या काही तास अगोदर शेअर्समध्ये जोरदार विक्री झाल्याने निफ्टी 37.95 अंकांची घट नोंदवून 9637.15 वर स्थिरावला, तर सेन्सेक्सही 118.93 अंकांची घट नोंदवून 31190.56 वर बंद झाला.

  मीडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली. बीएसईचा मीडकॅप इंडेक्स 92 अंकांनी घटला. तर निफ्टी मीडकॅप 100 इंडेक्समध्ये 0.5 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. बीएसई स्मॉलकॅप इंडेक्सही 99.4 अंकांनी घसरला.

  ऑटो, एफएमसीजी, फार्मा, रियाल्टी, कन्झ्युमर ड्युरेबल्स, कॅपिटल गुड्स आणि पॉवर शेअर्समध्ये प्रामुख्याने विक्री झाली. निफ्टीच्या ऑटो इंडेक्समध्ये 1.1 टक्के, एफएमसीजी इंडेक्समध्ये 1.4 टक्के आणि फार्मा इंडेक्समध्ये 0.6 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. बीएसईच्या रियाल्टी इंडेक्समध्ये 1.4 टक्के, कन्झ्युमर ड्युरेबल्स इंडेक्समध्ये 2 टक्के, कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये 1.2 टक्के आणि पॉवर इंडेक्समध्ये 1.6 टक्के घसरण झाली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.