Advertisement

मुहूर्ताच्या ट्रेडिंगलाच शेअर बाजाराने का खाल्ली आपटी?


मुहूर्ताच्या ट्रेडिंगलाच शेअर बाजाराने का खाल्ली आपटी?
SHARES

नव्या संवत 2074 वर्षाच्या महूर्ताच्या ट्रेडिंगलाच शेअर बाजाराने जोरदार आपटी खाल्ल्याने देशभरातील ब्रोकर्स आणि गुंतवणूकदारांची चांगलीच निराशा झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 194.39 ने घसरून 32,389.96 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 64.40 ने घ सरून 10,146.50 वर बंद झाला.


का घसरला शेअर बाजार?

बाजाराची सुरूवात होताच सेन्सेक्स 200 अंकाच्या घसरणीसह उघडला. निफ्टी मध्येही 60 अंकाची घसरण नोंदवण्यात आली. प्रामुख्याने ग्लोबल संकेत नकारात्मक झाल्याने शेअर बाजारावर दबाव निर्माण झाला. युरोपीयन मार्केटवर 'कॅटेलोनिया इशू' चा प्रभाव असल्याने या मार्केटमध्ये अर्धा टक्क्यांची घसरण झाली. त्याचा संपूर्ण परिणाम आशियातील मार्केटवर पडला. तसेच जीएसटी आणि महागाईच्या आकड्यांनी देखील मार्केटला साथ दिली नाही.


कुठले शेअर्स घसरले, वधारले?

प्रायव्हेट बँकांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. या सेक्टरचा इंडेक्स 1.37 टक्क्यांनी घरसरला, तर सरकारी बँकांचा इंडेक्स 0.7 टक्क्यांनी घसरला.
तर, रिलायन्स इंडस्ट्रीसहित अशोक लेलँड, बाटा इंडिया, अवंती फिड्स, इंडियाबुल्स हाऊसिंग, ब्रिटानिया इ. सारख्या 100 कंपनीच्या शेअर्सनी सर्वोत्तम पातळी गाठली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा