Advertisement

सेन्सेक्सच्या तेजीला ब्रेक, 63 अंकांची घट नोंदवून बंद


सेन्सेक्सच्या तेजीला ब्रेक, 63 अंकांची घट नोंदवून बंद
SHARES

मागील चार दिवसांपासून देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये सुरू असलेल्या तेजीला अखेर शुक्रवारी ब्रेक लागला. चांगला परतावा मिळवण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदारांनी शेअर्सविक्रीचा धडाका लावल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी घट नोंदवत बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 63 अंकांची घट नोंदवून 30188 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 21 अंकांनी घटून 9401 च्या पातळीवर स्थिरावला.

निफ्टी 50 मधील 32 कंपन्यांचे शेअर्स घट नोंदवून आणि 19 कंपन्यांचे शेअर्स वाढ नोंदवून बंद झाले. मीडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव होता. बीएसईचा मीडकॅप इंडेक्स 0.69 टक्क्यांनी घसरुन बंद झाला. तर निफ्टीच्या मीडकॅप 100 इंडेक्समध्ये 0.66 टक्क्यांची घसरण झाली आणि बीएसईचा स्मॉलकॅप इंडेक्स 0.80 टक्के घसरून बंद झाला.

रिएॅल्टी, ऑटो आणि आयटी सेक्टर वगळता इतर सर्व सेक्टरचे इंडेक्स घसरणीसह बंद झाले. विक्रीच्या दबावामुळे बँक निफ्टी 0.64 टक्के, फायनान्शिअल सर्विसेस 0.49 टक्के, निफ्टी एफएमसीजी 0.25 टक्के, निफ्टी मीडिया 2.10 टक्के, निफ्टी मेटल 0.11 टक्के, निफ्टी फार्मा 0.56 टक्के, निफ्टी पीएसयू बँक 0.63 टक्के, आणि निफ्टी प्रायव्हेट बँक 0.86 टक्के, तर बीएसईच्या कंझ्युमर ड्युरेबल्स इंडेक्समध्ये 0.98 टक्के, कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये 0.33 टक्के आणि पॉवर इंडेक्समध्ये 0.81 टक्के घट झाली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा