Advertisement

सेन्सेक्समध्ये 7, तर निफ्टीत 3 अंकांची नाममात्र वाढ


सेन्सेक्समध्ये 7, तर निफ्टीत 3 अंकांची नाममात्र वाढ
SHARES

ग्लोबल मार्केटमधील चढ उतारांमुळे मंगळवारी दिवसअखेर देशांतर्गत स्टॉक मार्केट नाममात्र वाढ नोंदवून बंद झाले. दिवसभरात बँकिंग, ऑटो, फार्मा, कन्झ्युमर ड्युरेबल कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाल्याने बाजारावर दबाव निर्माण झाला. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स केवळ 7 अंकांची लहानशी वाढ नोंदवून 29,933 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 3 अंकांनी वाढून 9316 वर बंद झाला. दिवसभरातील सत्रात निफ्टीच्या टॉप 50 कंपन्यांच्या यादीमधील 28 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी, तर 23 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली.

एनएसईवरील इंडो थाई सिक्युरिटीज, अन्सल प्रॉपर्टीज, एबीबी इंडिया, डीसीडब्ल्यू लि., सी अँड सी कन्स्ट्रक्ट, सिकागेन इंडिया, इंडिया बुल्स व्हेंचर्स, युरो सिरामिक्स, जे कुमार इन्फ्रा, विजया बँक, प्रिसिजन वायर्स, अनंत राज, जिलेट इंडिया, द वेस्टर्न इंडिया प्लायवूड लि., एसकेआयएल इन्फ्रा, मनाकसिया इंडस्ट्रीज लि., पिकॉक इंडस्ट्री, केईआय इंडस्ट्रीज, अटलांटा लि., डिगजॅम इंडिया या कंपन्यांचे स्टॉक्स 52 आठवड्यांच्या सर्वोत्तम पातळीवर पोहोचले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement