Advertisement

शेअर बाजारात दिवाळी धमाका, सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक


शेअर बाजारात दिवाळी धमाका, सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक
SHARES

मजबूत ग्लोबल संकेत आणि हेवीवेट शेअर्सच्या जोरदार खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने सोमवारी ३२, ६३४ अंकांवर झेप घेत नवा उच्चांक नोंदवला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’ने पहिल्यांदाच १० हजारांचा टप्पा पार करत १०,२०० अंकांवर मजल मारली आहे.


महागाई घटल्याचा परिणाम

दुपारच्या वेळेस घाऊक महागाईचे आकडे समोर आले. सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई घटून २.६० टक्क्यांवर आली. हे वृत्त समजताच शेअर बाजारातील खरेदीला प्रतिसाद वाढला.


भारती एअरटेल, महिंद्रा अण्ड महिंद्रा, एचयूएल, टाटा मोटर्स आणि सनफार्मा या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांनी वाढ झाली. तर रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसीस या महत्त्वाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. शिवाय सर्व क्षेत्रातील लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्सलाही चांगला प्रतिसाद मिळाला.


मार्केट कॅप १३८ कोटींवर

याच आधारे सेन्सेक्स २०१ अंकांची वाढ नोंदवून ३२, ६३४ अंकांवर गेला, तर निफ्टी ६३ अंकांनी वाढून १०,२०० अंकांवर पोहोचला. या वाढीमुळे बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप १३८.७४ कोटींवर गेले आहे. आक्टोबर महिन्यात गुंतवणूकदारांच्या रकमेत आतापर्यंत ६.७ लाख कोटींनी वाढ झाली आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा